मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला आहे.
आता लिव्ह इन रिलेशनशिपबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
पुरोगामी @PawarSpeaks साहेब आपल्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे असेल. देशाचा कायदा मात्र वेगळेच सांगतो… https://t.co/APaRfS8LWu
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 19, 2021
पुरोगामी पवारसाहेब आपल्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारं असेल पण देशाचा कायदा मात्र वेगळेच सांगतो, असे ट्विट करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.
दरम्यान, विवाहित स्त्री दुसर्या पुरुषाबरोबर नवरा-बायकोप्रमाणे राहत असल्यास ती लिव्ह-इन रिलेशनशिप मानली जाऊ शकत नाही. भारतीय दंड संहितेच्या लग्नविवाह कलम 494/495 अन्वये तो गुन्हा ठरतो, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. याच निर्णयाचा आधार घेत भातखळकर यांनी शरद पवारांसह धनंजय मुंडेवर टीका केली.
Read Also :
- ‘ते 36 वर आउट झाले, आपल्याला 44 जागा मिळाल्या’, भारताच्या विजयातून प्रेरणा घेण्याचा नेत्याचा काँग्रेसला सल्ला
- आजपासूनच मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
- पावसाळ्यापूर्वी नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करा, मुख्यमंत्र्यांचे बीएमसीला निर्देश
- ‘मजबूत वाडा घुशींनी पोखरून काढावा, तशीच…’; चीनच्या मुद्यावरून सेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- … तर तुमचा वीज पुरवठा खंडित होणार, महावितरण देणार ‘शॉक’