भाजप नेते धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. मात्र राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर महाडिक यांनी अचानक सुप्रिया सुळेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
कोल्हापूरमधून राष्ट्रवादीतर्फे खासदारकी भूषवलेल्या धनंजय महाडिक यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे महाडिक राष्ट्रवादीत पुनरागमन करणार का, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
मात्र ही भेट राजकीय नसून खासगी कामासाठी होती, असं स्पष्टीकरण महाडिक यांनी दिलं. सुप्रिया सुळे यांनी मुंबईत झालेल्या भेटीचा फोटो आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला. फोटोसोबत त्यांनी ‘लेटपोस्ट’ असा हॅशटॅग लिहिला आहे.