मुंबई : शिवसेना हा देशात अजिंक्य असा पक्ष आहे. म्हणूनच आम्ही भाजपचे 105 आमदार घरी बसवले. यावेळी त्यांचे 105 आहेत पुढच्या विधानसभेला शिवसेनेचे 105 आमदार असतील, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. यावर आता भाजपकडून सेनेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
जागा जिंकायचे तर सोडाच, पुढील निवडणुकीत शिवसेनेला 105 जागांवर लढता तरी येईल का ?, असा टोला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला लगावला आहे.
केशव उपाध्ये म्हणाले की, आता शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीत 105 आमदार निवडून आणण्याच्या गप्पा मारत आहे. मात्र, पुढच्या निवडणुकीत 105 आमदार निवडून यायचं सोडा पण शिवसेनेला महाविकासआघाडीत तेवढ्या जागा तरी मिळतील का ?
महाविकास आघाडीत एकत्र निवडणूक लढवताना एवढ्या जागा मिळणार नाहीत, याची मानसिकता शिवसेनेने तयार करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.