मुंबई : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आतापासूनच जोरदार तयारी केली जात आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वचजण पश्चिम बंगालचा दौरा करून पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील दोन दिवस पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या रॅली आणि सभांना यावेळी प्रचंड गर्दी होताना दिसत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस व सीएएममधील 11 आमदारांनी व एका माजी खासदाराने भाजपात प्रवेश केला. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यावरून निशाणा साधला आहे.
पश्चिम बंगालमधील भाजपच्या सभांना होणाऱ्या गर्दीचा व्हिडीओ शेअर निलेश राणेंनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
बंगाल मध्ये BJP ची सभा… एकदा लोकांनी ठरवलं कोणाला आडवं करायचं मग आडनाव बॅनर्जी असुदे किंव्हा ठाकरे, पवार ते आडवे करणारच. संज्या हे बघून ठेव, विसरू नको. अति तिथे माती होणारच. pic.twitter.com/9GoFA5O3Y5
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 20, 2020
निलेश राणेंनी ट्विट केले की, श्चिम बंगालमध्ये भाजपाची सभा. एकदा लोकांनी ठरवलं कोणाला आडवं करायचं मग आडनाव बॅनर्जी असुदे किंवा ठाकरे, पवार ते आडवे करणारच. संजय राऊत हे बघून ठेव. विसरू नका. अति तिथे माती होणारच, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या अमित शाहांच्या सभांना प्रचंड गर्दी होताना पाहण्यास मिळत आहे. तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.