बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांनी ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली आहे. पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडल्याने कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली जात आहे. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांची प्रकृती लवकर ठिक व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली आहे.
सेल्फी विथ खड्डे… घेणाऱ्या सुप्रियाताई आता कुठे आहेत? मुंबईतील खड्यावरून विरोधक आक्रमक
मिळालेल्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुढील तीन चार दिवस पूरग्रस्त मराठवाडा दौरा असणार आहे. याच दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली आहे. ट्वीट करत पंकजा मुंडे म्हणाल्या की, दोन चार दिवस आराम करणार आहे. फोन कॉल घेणंही शक्य नाही. देवेंद्र फडवीस यांच्या दौऱ्याआधीच पंकजा मुंडे यांची अचानक तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली आहे.
Unwell..tonsillitis n blisters in my throat adviced strick voice rest for 2 to 4 days … can't take calls or meet in person..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 1, 2021
बरं वाटत नसल्याने पंकजा मुंडे यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कोणालाही भेटू शकणार नाही आणि आराम करणार असल्याचं ट्वीट केलं आहे. त्याच वेळी देवेंद्र फडणवीस मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या ट्वीटवरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
Read Also :
- पवारसाहेबांना पंतप्रधान अन् अजितदादांना मुख्यमंत्रीपदी बसलेलं बघायचयं – खासदार अमोल कोल्हे
- पिंपरी चिंचवड महापालिकेचा बाजीगर कोण? तीन ४३ च्या प्रभाग रचनेत कोणाच्या नाड्या आवळल्या जाणार?
- सत्तेचा अमर पट्टा घेऊन जन्माला आलेलं हे सरकार नाही; काही दिवसात आमचं सरकार निश्चित येणार – फडणवीस
- शिवसेना खासदार भावना गवळींना वर्षावर नो एन्ट्री; अर्धा तास थांबूनही उद्धव ठाकरेंची भेट नाही
- वाशिम जिल्ह्यात महाविकास आघाडीत पडली फूट; मतदारसंघामध्ये तिरंगी-चौरंगी लढत रंगणार