“सत्तेचा माज कोकणी जनता उतरवतेच”, अशी टीका भाजप नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी गितेश राऊत यांच्या कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर केली आहे.
दोन दिवसांपूर्वी पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, तो शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा पुत्र गितेश राऊत असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणावर प्रमोद जठार यांनी टीका केली आहे.
“सत्तेचा माज कोकणातील जनतेने त्या त्या वेळी उतरवला आहे. एकवेळ हे प्रकरण अन्य मार्गाने मिटवले जाईल, तडजोड केली जाईल. मात्र सिंधुदुर्गातील जनता हे बघतेय. ‘ये लोग सब जानते है”, असंही त्यांनी सांगितले.
प्रमोद जठार म्हणाले, “तो कोणाचाही मुलगा असुदे, येथील जनता त्यांना माफ करणार नाही. कोरोनाच्या काळात जिवाची बाजी लावून पोलीस, डॉक्टर, नर्सेस काम करत आहेत. जर यांना कुणी अपशब्द बोलत असेल आणि वाईट वागणूक देत असेल तर अशा लोकांना जनता माफ करणार नाही.”