मुंबई : महाविकास आघाडीत सातत्याने कोणत्याना कोणत्या मुद्यावरून कुरबुरी पाहण्यास मिळत आहे. आता औंरगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्यावरून काँग्रेस आणि शिवसेना आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्यावर ठाम आहे, तर काँग्रेसने या नामांतराला जाहीर विरोध केला आहे.
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून भाजपकडून देखील सातत्याने शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधला जात आहे. दोन्ही पक्षांचे हे नाटक असल्याचा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे.
स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आम्ही औरंग्याची औलाद नाही आम्ही छत्रपती संभाजी महाराजांची औलाद आहोत..! pic.twitter.com/UFJLUbNP64
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) January 7, 2021
भाजपकडून शहराच्या नामांतराला समर्थन देण्यात आले आहे. सोबत यावरून शिवसेनेवर देखील टीकेची तोफ डागली आहे. आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आम्ही औरंग्याची औलाद नाही आम्ही छत्रपती संभाजी महाराजांची औलाद आहोत, असे म्हणत शहराच्या नामांतराला पाठिंबा दिला आहे.
मुनगंटीवार म्हणाले की, प्रश्न शहराच्या नामांतराचा नाही. त्यामागची गंभीरता आधी समजून घेतली पाहिजे. औरंगजेब हा आक्रमणकारी होता, त्याने स्वतःच्या भावाला कैदेत टाकले, भावांना मारले. तो स्वतःला गाझी म्हणायचा. त्याने जजिया कर लावला.
छत्रपती संभाजी महाराजांचे नाव जरी घेतले, तरी आमच्या रक्तात चैतन्य येते. त्याने संभाजीराजांवर अत्याचार केले. अशा अत्याचार करणाऱ्याचे नाव औरंगाबादला आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आम्ही औरंग्याची औलाद नाही आम्ही छत्रपती संभाजी महाराजांची औलाद आहोत, अशी आठवण देखील त्यांनी करून दिली.
Read Also :
- ‘त्या’ घटनेबाबत रामदास आठवले थेट ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा करणार
- लस घेतलेल्यांची अशी पटणार ओळख, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती
- 2024 पर्यंत लढा देण्याची आमची तयारी, शेतकरी आंदोलकांचा इशारा
- शरद पवारांनी डिलीट केले महेश कोठेंच्या प्रवेशाचे ट्विट, पण का ?
- …म्हणून काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतराला विरोध आहे, थोरातांनी सांगितले कारण
- पिंपरी चिंचवडमध्ये आढळले नव्या कोरोना स्ट्रेनचे 3 रुग्ण, आरोग्यमंत्र्यांची माहिती