मुंबई : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्रपती निवडणुकीत पराभव झाल्याने संतापलेल्या त्यांच्या समर्थकांनी संसदेत घुसून तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अमेरिकेत झालेल्या या हिंसाचाराने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या लोकशाहीवर देखील प्रश्न उपस्थित झाले. आता या हिंसाचाराविषयी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करून आपण चर्चा करणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
रामदास आठवले म्हणाले की, अमेरिकेत घडलेला हिंसाचर निंदनीय आहे. ही केवळ रिपब्लिकन पक्षासाठीच वाईट गोष्ट नसून, अमेरिका आणि लोकशाहीसाठी देखील वाईट आहे. मी ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा करण्याचा प्रयत्न करेल.
The incident that took place (at US Capitol) is condemnable. It is not only an insult to the Republican Party but also to America & democracy. That is why we are expressing our displeasure. I will try to speak to him (Trump) over phone: Union Minister Ramdas Athawale (08.01) pic.twitter.com/Py3gUUDYX1
— ANI (@ANI) January 9, 2021
डोनाल्ड ट्रम्प यांना स्वत:ला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही, असे देखील आठवलेंनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबत आम्हाला आदर होता मात्र त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव मान्य न करता पदावर राहण्याची केलेली कृती लोकशाही विरोधी आणि रिपब्लिकन प्रतीमेला काळिमा फासणारी आहे, अशी टीका रामदास आठवलेंनी केली.
Read Also :
- लस घेतलेल्यांची अशी पटणार ओळख, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती
- 2024 पर्यंत लढा देण्याची आमची तयारी, शेतकरी आंदोलकांचा इशारा
- शरद पवारांनी डिलीट केले महेश कोठेंच्या प्रवेशाचे ट्विट, पण का ?
- …म्हणून काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतराला विरोध आहे, थोरातांनी सांगितले कारण
- पिंपरी चिंचवडमध्ये आढळले नव्या कोरोना स्ट्रेनचे 3 रुग्ण, आरोग्यमंत्र्यांची माहिती
- नितीन गडकरींचा जोशी सरांना वाकून नमस्कार, फोटो व्हायरल