वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती निवडणुकीत अद्याप आपला पराभव मान्य केलेला नाही. ड्रम्प यांचा पराभव मान्य नसल्याने त्यांच्या समर्थकांनी धुडगूस घालत हिंसाचार केला आहे. ट्रम्प यांचे समर्थक वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसले आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.
या हल्ला प्रकरणी 13 लोकांना अटक करण्यात आली आहे. वॉशिंग्टन डीसी मेट्रोपोलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. ट्रम्प समर्थकांनी केलेल्या या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
Several of President Trump's top aides, including national security adviser Robert O'Brien, are considering resigning in the wake of his response to a pro-Trump mob breaching the US Capitol today, reports CNN
— ANI (@ANI) January 7, 2021
निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत इलेक्टोरल कॉलेजबाबत चर्चा सुरु होती. बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. परंतु त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले, परिणामी संसदेचं कामकाज थांबवावं लागलं.
दरम्यान, ट्विटरकडून ट्रम्प यांचे अकाउंट लॉक करण्यात आले आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये उद्भवलेल्या हिंसक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे तीन ट्वीट्स हटवावेत, अशी आमची मागणी आहे. नागरी अखंडत्व धोरणाचे वारंवार आणि गंभीर उल्लंघन त्यांनी केलं आहे. ट्विट्स न हटवल्यास ट्रम्प यांचे अकाऊण्ट लॉक राहील, असे ट्विटरने म्हटले आहे.
Read Also :
- ‘आमच्यावर टीका केल्याशिवाय ते मोठे होऊ शकत नाहीत’ शिवसेना नेत्याचा भाजपला टोला
- …म्हणून पहिला मान धनंजयचा! सिंधुताईंनी मानले धनंजय मुंडेंचे आभार
- ‘संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत, नामांतराचे राजकारण खेळू नये’, काँग्रेसने CMO ला ठणकावले
- CMO कडून औरंगाबादसंदर्भात करण्यात आलेले ‘ते’ ट्विट चर्चेत
- SEBC आरक्षण न ठेवता पोलीस भरती, ठाकरे सरकारचा निर्णय
- ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कुठलाही लाभ मिळणार नाही – फडणवीस