मुंबई : औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. एकीकडे शिवसेना औरंगबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यावर ठाम आहे, तर दुसरीकडे काँग्रेसकडून मात्र विरोध केला जात आहे. या मुद्यावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची देखील शक्यता आहे.
काँग्रेस प्रदेशाध्य बाळासाहेब थोरात यांनी देखील जाहीरपणे नामांतराला विरोध केला आहे. मात्र असे असतानाही मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेत्याच्या खात्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी करण्यात आलेल्या ट्विटमध्ये सीएमओकडून संभाजीनगर असा उल्लेख असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.#मंत्रिमंडळनिर्णय @AmitV_Deshmukh pic.twitter.com/LqkMo2uXgi
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 6, 2021
काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतरणाला स्पष्ट विरोध आहे. त्यात काँग्रेस नेते व वैद्यकीय शिक्षण सांसकृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या पोस्टरमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे.
Read Also :
- SEBC आरक्षण न ठेवता पोलीस भरती, ठाकरे सरकारचा निर्णय
- ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कुठलाही लाभ मिळणार नाही – फडणवीस
- मेट्रो कारशेडची जागा निश्चित करण्यासाठी ठाकरे सरकारकडून समिती गठीत
- … आणि रोहित पवारांनी स्वतः हातगाडीवर अंडा-भुर्जी बनवली
- चंद्रकांत पाटलांच्या गावातच भाजपची चक्क काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी
- औरंगाबादचे नामांतरण म्हणजे शिवसेना-काँग्रेसचे नाटक, फडणवीसांचा घणाघात