मुंबई : मेट्रो-3 चे कारशेड आरे येथून हटवून कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र येथील कामही तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे सरकार आता कारशेडसाठी नवीन जागेची चाचपणी करत आहे.
मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी नवीन जागेची चाचपणी करण्यासाठी ठाकरे सरकारने आता हा सदस्यीय समिती गठीत केलीय. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत झालीय. ही समिती मुंबई मेट्रो मार्गिका तीन, चार आणि सहा या तीन मेट्रो मार्गीकांचा एकत्रित कार डेपो करण्यासाठी अभ्यास करेल. समिती एका महिन्यात राज्य सरकारला याबाबत अहवाल सादर करणार आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हींनी कांजूरमार्ग येथील जागेवर दावा केल्यानंतर हा वाद सुरू झाला होता. कांजूरमार्गच्या जागेवर कारशेडचं काम करण्यास कोर्टाने तूर्तास स्थगिती दिली आहे. आता नवीन जागेसाठी राज्य सरकारने समिती स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही समिती आरे येथील यापूर्वी मेट्रो 3 कारशेड डेपोसाठी प्रस्तावित केलेला आराखडा पुरेसा आहे किंवा आणखी जमीन किंवा आणखी वृक्ष तोड करण्याची आवश्यकता भासेल का याबाबत तपासणी करणार आहे. याशिवाय मेट्रो तीन व सहा यांच्या मार्गीकेचं एकत्रीकरण सुलभरीत्या करणं शक्य आहे का आणि यासाठी अंदाजित खर्च व कालावधी किती याचीही तपासणी ही समिती करेल.
Read Also :
- … आणि रोहित पवारांनी स्वतः हातगाडीवर अंडा-भुर्जी बनवली
- चंद्रकांत पाटलांच्या गावातच भाजपची चक्क काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी
- औरंगाबादचे नामांतरण म्हणजे शिवसेना-काँग्रेसचे नाटक, फडणवीसांचा घणाघात
- … आणि पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातच ड्राय रनसाठी चक्क सायकलवरून पोहचवली लस
- ‘दोन तास वर्दी बाजूला ठेवा, मग तुम्हाला दाखवतो’, मनसेचे पोलिसांना थेट आव्हान
- ‘शिवसेनेवर संगतीचा परिणाम, उद्या ते मुस्लिमांचाही मेळावा घेतील’, दानवेंचा टोला