वाराणसी : सरकारने दोन कोरोना प्रतिंबधक लसींना परवानगी दिल्यानंतर आता लसीकरण प्रक्रियेची तयारी सुरू झाली आहे. यासाठी विशेष नियोजन केले जात आहे. देशभरातील अनेक सेंटरवर लसीकरण प्रक्रिया सुरू होण्याआधी ड्राय रन घेण्यात आले. मात्र यादरम्यान लसीकरण प्रक्रियेच्या नियोजनाची विचित्र स्थिती पाहण्यास मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीमध्ये ड्राय रनदरम्यान आरोग्य कर्मचारी चक्क सायकलवरुन कोरोना लसीचा डमी बॉक्स घेऊन रुग्णालयात दाखल झाल्याने नियोजनाची पोलखोल झाली.
वाराणसीमधील चौकाघाट कोरोना लसीकरण केंद्र असणाऱ्या महिला रुग्णालयात चक्क सायकलवरुन लस पोहचवण्यात आली. विशेष म्हणजे ही लस रुग्णालयात पोहचली तेव्हा तेथेही कोणतीच तयारी करण्यात आली नसल्याचे दिसून आले.
याबाबत वाराणसीचे मुख्य आरोग्य अधिकारी असणाऱ्या डॉ. व्ही. बी. सिंह यांनी सांगितले की, 5 केंद्रावर व्हॅनने लस पोहचवण्यात आली, तर केवळ महिला रुग्णालयामध्ये सायकल कॅरियरच्या माध्यमातून लस पोहचवण्यात आली.
Read Also :
- ‘दोन तास वर्दी बाजूला ठेवा, मग तुम्हाला दाखवतो’, मनसेचे पोलिसांना थेट आव्हान
- ‘शिवसेनेवर संगतीचा परिणाम, उद्या ते मुस्लिमांचाही मेळावा घेतील’, दानवेंचा टोला
- ‘आमच्या हातात गुजरात द्या, ‘अहमदाबाद’ला तुमचे नाव देतो’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा चंद्रकांत पाटलांना टोला
- … तर मी शिक्षा भोगायलाही तयार – गिरीश महाजन
- महिला प्रश्नांच्या अनुषंगाने मेधा पाटकरांनी घेतली यशोमती ठाकूर यांची भेट
- रोहित पवारांनी थेट अजितदादांना पत्र लिहित केली ‘ही’ मागणी
- हवाई दलाचे MiG-21 विमान क्रॅश, पायलट सुरक्षित