मुंबई : गरीब वस्त्यांतील महिलांच्या प्रश्नांच्या संदर्भात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेतली.
गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना मूलभूत सोयीसुविधा मिळणे आवश्यक आहे. तेथे पिण्याच्या पाण्यासाठी नळजोड, शौचालयाची व्यवस्था होणे या बाबी महिलांचे दैनंदिन जीवन सुसह्य आणि सुरक्षिततेच्याही दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती पाटकर यांनी यशोमती ठाकूर यांनी केली.
गरीब वस्त्यांतील महिलांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या @medhanarmada यांनी महिला व बालविकास मंत्री @AdvYashomatiINC यांची घेतली भेट. सर्वंकष महिला धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेत श्रीमती पाटकर यांनी मांडलेल्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करणार-ॲड.ठाकूर pic.twitter.com/nNQXUagYd9
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 5, 2021
विविध विभागांबरोबर अभिसरणाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सुमारे 520 कोटी रुपये खर्चाचा ‘नव तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम प्रकल्प’ राबविण्यास मान्यता देण्यात आली असून ग्रामीण महिलांमध्ये उद्यमशीलतेचा विकास, त्यांना लघुउद्योग उभारणीसाठी मदत आदी महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. यापूर्वीच्या महिला धोरणात असलेल्या त्रुटी काढून सर्वंकष महिला धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये विविध विभागांकडील पायाभूत प्रकल्प, सेवा, सुविधांच्या आखणी प्रसंगी महिलां केंद्रीततेचाही विचार व्हावा अशी तरतूद त्यात केली जाईल. त्याचा आढावा घेतला जाईल, असे यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या.
यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती इद्झेस कुंदन, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी- शर्मा उपस्थित होत्या.
Read Also :
- रोहित पवारांनी थेट अजितदादांना पत्र लिहित केली ‘ही’ मागणी
- हवाई दलाचे MiG-21 विमान क्रॅश, पायलट सुरक्षित
- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल
- मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी कॉरिडोरमध्ये चहा पिऊ नये, राज्य सरकारचं नवं परिपत्रक
- ‘नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं करा’, उद्धव ठाकरेंना ‘या’ आमदाराने सूचवलं नाव
- प्रस्ताव ‘मंत्रालया’तून आला की ‘वर्षा’वरून? मुंबई महापालिकेत शिवसेना-काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी
- औरंगाबाद नामांतरण : शिवसेना बाजूने, काँग्रेस विरोधात, आता राष्ट्रवादीची भूमिका जाहीर