मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फोनवरून अज्ञान व्यक्तीने धमकी दिली असून, यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
21 डिसेंबर रोजी महापालिका मुख्यालयात असतानाच किशोरी पेडणेकर यांना धमकीचा फोनकॉल आला होता. याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
किशोरी पेडणेकर यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले. परंतु, त्यांना 22 डिसेंबर रोजी हा फोन आला. मात्र, त्यांनी 31 डिसेंबरला इतक्या उशिरा का पोलिसांत तक्रार दाखल केली? यासह अनेक चर्चांना उधाण आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर रोजी एका अनोळखी नंबरवरून किशोरी पेडणेकर यांना फोन आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव न सांगता पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती.
Read Also :
- कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची गरज नाही, आरोग्य मंत्रालयाची माहिती
- मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी कॉरिडोरमध्ये चहा पिऊ नये, राज्य सरकारचं नवं परिपत्रक
- ‘नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं करा’, उद्धव ठाकरेंना ‘या’ आमदाराने सूचवलं नाव
- प्रस्ताव ‘मंत्रालया’तून आला की ‘वर्षा’वरून? मुंबई महापालिकेत शिवसेना-काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी
- औरंगाबाद नामांतरण : शिवसेना बाजूने, काँग्रेस विरोधात, आता राष्ट्रवादीची भूमिका जाहीर
- ‘भाजपाने नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही’
- ‘औरंगाबादचं नाही तर पुण्याचं नामकरण संभाजीनगर करावं’, प्रकाश आंबेडकरांची मागणी