नवी दिल्ली : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवरील लस लवकरच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे. भारतात 2 लसींना मंजूरी देण्यात आली आहे, त्यामुळे लवकरच लसीकरण प्रक्रिया सुरू होऊ शकते. डीसीजीआयने 3 जानेवारी रोजी लसींना मंजुरी दिली होती, त्यामुळे आता 13 ते 14 जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष लसीकरणास देशात सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लस टोचून घेण्यासाठी सर्वसामान्यांना नोंदणी करणे अनिवार्य आहे. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची आवश्यकता नसल्याची माहिती दिली आहे.
Healthcare workers and frontline workers would not need to register themselves as a beneficiary as their data is bulk database that has been populated on the Co-WIN vaccine delivery management system in a bulk manner: Union Health Secretary Rajesh Bhushan pic.twitter.com/NHrl0r8YED
— ANI (@ANI) January 5, 2021
कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची आवश्यकता नसणार आहे. दहा दिवसांमध्ये लसीकरण सुरू करण्यास आम्ही सज्ज आहोत, आता अंतिम निर्णय सरकारला घ्यायचा आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. लवकरच सर्वसामान्यांसाठी लस उपलब्ध होईल.
Read Also :
- मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी कॉरिडोरमध्ये चहा पिऊ नये, राज्य सरकारचं नवं परिपत्रक
- ‘नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं करा’, उद्धव ठाकरेंना ‘या’ आमदाराने सूचवलं नाव
- प्रस्ताव ‘मंत्रालया’तून आला की ‘वर्षा’वरून? मुंबई महापालिकेत शिवसेना-काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी
- औरंगाबाद नामांतरण : शिवसेना बाजूने, काँग्रेस विरोधात, आता राष्ट्रवादीची भूमिका जाहीर
- ‘भाजपाने नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही’
- ‘औरंगाबादचं नाही तर पुण्याचं नामकरण संभाजीनगर करावं’, प्रकाश आंबेडकरांची मागणी