नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काल नवी मुंबईत विविध ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी नवी मुंबईत भेटी दरम्यान त्यांनी नागरीक, दुकानदार, विक्रेते यांच्याशी संवाद साधला. त्यांना आग्रहाने कलींगड, ज्यूस, चहा देखील दिला.
नवी मुंबईत अनेक ठिकाणी भेट दिल्यानंतर भूक लागल्यानंतर रोहित पवारांनी हातगाडीवर खास अंडा-भूर्जीचा देखील आस्वाद घेतला. विशेष म्हणजे यावेळी तरुणाचे कौशल्य पाहून त्यांनी देखील स्वतः अंडा-भूर्जी बनविण्याचा प्रयत्न केला.
नवी मुंबईत विविध ठिकाणी भेट देत असताना भूक लागल्याने एके ठिकाणी सर्वांनी अंडा भुर्जीचा आस्वाद घेतला.यावेळी अंडा भुर्जी बनवतानाचं त्या युवाचं स्कील पाहून मलाही अंडा-भुर्जी बनवण्याचा मोह आवरला नाही.शेवटी त्याच्यासारखी भुर्जी मला बनवता आली नाही पण प्रयत्न केल्याचा आनंद मात्र मिळाला. pic.twitter.com/T93MXIFcu3
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 5, 2021
अंडा-भूर्जी बनवत असल्याचा व्हिडीओ रोहित पवारांनी ट्विटरवर शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, नवी मुंबईत विविध ठिकाणी भेट देत असताना भूक लागल्याने एके ठिकाणी सर्वांनी अंडा भुर्जीचा आस्वाद घेतला.यावेळी अंडा भुर्जी बनवतानाचं त्या युवाचं स्कील पाहून मलाही अंडा-भुर्जी बनवण्याचा मोह आवरला नाही.शेवटी त्याच्यासारखी भुर्जी मला बनवता आली नाही पण प्रयत्न केल्याचा आनंद मात्र मिळाला.
दरम्यान, रोहित पवारांनी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. तसेच, नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर साहेब यांचीही भेट घेतली.
Read Also :
- चंद्रकांत पाटलांच्या गावातच भाजपची चक्क काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी
- औरंगाबादचे नामांतरण म्हणजे शिवसेना-काँग्रेसचे नाटक, फडणवीसांचा घणाघात
- … आणि पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातच ड्राय रनसाठी चक्क सायकलवरून पोहचवली लस
- ‘दोन तास वर्दी बाजूला ठेवा, मग तुम्हाला दाखवतो’, मनसेचे पोलिसांना थेट आव्हान
- ‘शिवसेनेवर संगतीचा परिणाम, उद्या ते मुस्लिमांचाही मेळावा घेतील’, दानवेंचा टोला
- ‘आमच्या हातात गुजरात द्या, ‘अहमदाबाद’ला तुमचे नाव देतो’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा चंद्रकांत पाटलांना टोला