कोल्हापूर : सत्ता टिकवण्यासाठी कोण कधी एकत्र येईल हे सांगता येत नाही. राज्यात सध्या महाविकास आगाडी सत्तेत आहे, तर भाजप विरोधी पक्षात. मात्र स्थानिक निवडणुकांमध्ये अगदी याच्या उलट चित्र पाहण्यास मिळत आहे.
राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे गाव असलेले खानापूर निवडणुकीच्या आधीच चर्चेत आले आहे. येथे चक्क शिवसेनेविरोधात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हातमिळवणी केली आहे.
राज्यात जरी महाविकास आघाडीची सत्ता असली तरी, स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची जोरदार चर्चा आहे.
भुदरगड तालुक्यातील खानापूर गावात सध्या भाजपची सत्ता आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख असलेले प्रवीण सावंत भाजपमध्ये गेले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते भाजपवासी झाले. यातून गावात राजकीय चुरस निर्माण झाली आहे.
Read Also :
- औरंगाबादचे नामांतरण म्हणजे शिवसेना-काँग्रेसचे नाटक, फडणवीसांचा घणाघात
- … आणि पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातच ड्राय रनसाठी चक्क सायकलवरून पोहचवली लस
- ‘दोन तास वर्दी बाजूला ठेवा, मग तुम्हाला दाखवतो’, मनसेचे पोलिसांना थेट आव्हान
- ‘शिवसेनेवर संगतीचा परिणाम, उद्या ते मुस्लिमांचाही मेळावा घेतील’, दानवेंचा टोला
- ‘आमच्या हातात गुजरात द्या, ‘अहमदाबाद’ला तुमचे नाव देतो’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा चंद्रकांत पाटलांना टोला
- … तर मी शिक्षा भोगायलाही तयार – गिरीश महाजन
- महिला प्रश्नांच्या अनुषंगाने मेधा पाटकरांनी घेतली यशोमती ठाकूर यांची भेट
- रोहित पवारांनी थेट अजितदादांना पत्र लिहित केली ‘ही’ मागणी