पुणे : पुणे जिल्ह्यातील आलेगाव पागा (ता. शिरूर) येथील बंद पडलेले वसतिगृह हस्तांतरीत करून सिंधुताई सपकाळ यांच्या ‘दी मदर ग्लोबल फाऊंडेशन’ यांना देण्यात आले आहे. काही स्वयंसेवी संस्था शासनाच्या अटी व शर्तीची पूर्तता करत नसल्याने शासनाने अशा 36 अनुदानित वसतिगृहांची मान्यता रद्द केलेली आहे. अशी बंद पडलेली अनुदानित वसतिगृहे इतर इच्छुक संस्थांना हस्तांतर व स्थलांतर करणेबाबत शासनाने धोरण ठरवले आहे.
बंद पडलेले वसतिगृह संस्थेस दिल्याने सिंधुताई सपकाळ यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. सिंधुताई यांचे कार्य संपूर्ण राज्याने पाहिले, त्यामुळे त्यांच्या संस्थेस सदर अनुदानित वसतिगृह हस्तांतर करण्याबाबत विभागातील अधिकाऱ्यांना धनंजय मुंडेंनी निर्देशित केले होते.
‘ज्याला कोणी नाही त्याला माई, परंतु माईंच्या कोणत्याही संस्थेस किंवा कार्यास शासकीय अनुदान आजवर मिळाले नाही; संघर्षातून वर आलेल्या धनंजयने आज ते मिळवून दिले. अनाथ, निराधार लेकरांना छत मिळवून दिले, म्हणून पहिला मान धनंजयचा!‘ अशा शब्दात माईंनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले.
याबाबत धनंजय मुंडे म्हणाले की, माईंच्या संस्थेच्या माध्यमातून अनाथांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय विभाग नेहमीच प्रयत्नशील राहील. अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या माईंच्या संस्थेसाठी काहीतरी करता आले याचा मला आनंद असून, अनुदानित वसतिगृहाच्या माध्यमातून माईंची संस्था निश्चितच गरजवंत विद्यार्थ्यांसाठी आधार केंद्र बनेल असा विश्वास आहे.
Read Also :
- ‘संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत, नामांतराचे राजकारण खेळू नये’, काँग्रेसने CMO ला ठणकावले
- CMO कडून औरंगाबादसंदर्भात करण्यात आलेले ‘ते’ ट्विट चर्चेत
- SEBC आरक्षण न ठेवता पोलीस भरती, ठाकरे सरकारचा निर्णय
- ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कुठलाही लाभ मिळणार नाही – फडणवीस
- मेट्रो कारशेडची जागा निश्चित करण्यासाठी ठाकरे सरकारकडून समिती गठीत
- … आणि रोहित पवारांनी स्वतः हातगाडीवर अंडा-भुर्जी बनवली