मुंबई : गेली अनेकवर्ष सोबत असलेले शिवसेना-भाजप हे एकेकाळचे मित्र पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर वेगळे झाले असले तरी या पक्षाच्या नेत्यांची अनेकदा भेट होत असते. दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आले की चर्चा तर हमखास होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेच्या दोन नेत्यांची भेट घेतल्यानंतर
गडकरींनी काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली.
केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी सरांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/LzFqht77uZ
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) January 7, 2021
या बैठकीच्या निमित्तानं मुंबईत असलेले गडकरी हे सकाळी जोशी सरांच्या निवासस्थानी पोहोचले. तिथं पोहोचताच गडकरी यांनी सरांना वाकून नमस्कार केला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्याशी गप्पाही मारल्या.
या भेटीविषयी विचारले असता नितीन गडकरी म्हणाले की, मी मनोहर जोशींसोबत काम केलं होतं. अनेक दिवसांपासून भेटणं प्रलंबित होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्याने त्यांच्याकडे आज गेलो होतो. त्यांच्या पत्नीचा देहांत झाला होता, पण त्यावेळी कोव्हीडमुळे येऊ शकलो नाही. म्हणून आज व्यक्तिगत भेट घेतली. उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबीयांशी वैयक्तीक संबंध आहेत. आज वैयक्तीक चर्चा झाली. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण होते. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असेही ते यावेळी आवर्जुन म्हणाले.
Read Also :
- कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च केंद्राने करावा, राज्य सरकारची मागणी
- मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची ठाम भूमिका – उद्धव ठाकरे
- विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने नितीन राऊत, मुकुल वासनिक यांना दिली महत्त्वाची जबाबदारी
- चर्चेआधी शेतकऱ्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, आजच्या बैठकीत तोडगा निघणार ?
- नाशिकमधील भाजपचे मोठे नेते सेनेच्या वाटेवर, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश