भाजपात गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पुन्हा पक्षात परतणार असल्याचे वक्तव्य करत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली होती. अशा परिस्थितीतच भाजपच्या राज्यातील नेत्याने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याने चर्चा सुरू झाली.
With Shri.@ShelarAshish pic.twitter.com/j2nj7KUqcE
— Supriya Sule (@supriya_sule) August 11, 2020
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी नरिमन पॉइंट येथील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. स्वतः सुप्रिया सुळे यांनी शेलार यांच्यासोबतच फोटो ट्विटरवर शेअर करत याची माहिती दिली. मात्र आशिष शेलार यांनी क्रिकेट व अन्य काही विषयांच्या संदर्भात ही भेट असल्याचे म्हटले आहे.
या भेटीबाबत आशिष शेलार म्हणाले की, राजकारण सोडूनही भेटी होतात. हाच महाराष्ट्र आणि राजस्थानमधील फरक आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षातील लोकही सहज भेटतात, हाच महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा आहे.