बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी बढत घेतली होती. मात्र, महाआघाडी व एनडीए यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचा आकडा कमी होताना दिसत असून, एनडीचा आकडा वाढू लागला आहे.
मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीनं मोठी झेप घेतली होती. मात्र, नंतरच्या फेऱ्यांमध्ये घसरण झाल्याचं दिसून येत आहे. आताच हाती आलेल्या कलांनुसार एनडीए सध्या १२५ जागी आघाडीवर आहे. यात भाजपा ७० जागा, जदयू ४८, व्हीआयपी ६, तर हम एका जागेवर आघाडीवर आहे. महाआघाडीने सध्या १०१ जागांवर आघाडी घेतली आहे. यात राजद ६२, काँग्रेस २० तर डावे १९ जागांवर आघाडीवर आहे