मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमआयडीसीच्या ‘महाजॉब्स पोर्टल’चे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. मात्र नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या कौशल्य विकास खात्याचे रोजगार देणारे ‘महास्वयम’ पोर्टल आधीपासून अस्तित्वात आहे. हा शिवसेना आणि राष्ट्रवादीत समन्वयाचा अभाव आहे का? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी विचारला आहे.
“शिवसेनेकडे असणाऱ्या उद्योग खात्याने तरुणांना रोजगार मिळावा म्हणून ‘महाजॉब’ नावाचं पोर्टल कोट्यवधी रुपये खर्च करुन बनवलं. परंतु अशा स्वरुपाचं पोर्टल राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या कौशल्य विकास खात्यात ‘महास्वयम’ या नावानं कित्येक वर्षापासून अस्तित्वात आहे” असे राम कदम म्हणाले
“आता हा प्रश्न निर्माण होतो की शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे? की आपसातील भांडण? की तरुणांना जॉब मिळाल्यावर दोन्ही पक्षांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न? पोर्टलच्या निमित्ताने कुणाचे उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न आहे? महाराष्ट्रातील जनतेच्या पैशाच्या उधळपट्टीचे नेमके काय कारण? आमच्या पोलिसांचा कापलेला पगार द्यायला पैसे नाहीत म्हणणाऱ्या सरकारने याचे उत्तर द्यावे” असे राम कदम म्हणाले.
1/1महास्वयं नाम का पोर्टल रोजगार देने के लिए पहले से ही था यह डिपार्टमेंट राष्ट्रवादी @nawabmalikncp के पास है उसके बावजूद भी करोड़ों रुपए खर्च करके @Subhash_Desai उद्योग मंत्रालय ने महा जॉब नाम का पोर्टल बनाया यदि कुछ सुधार करने थे पुराने पोर्टल में भी हो सकते थे @CMOMaharashtra
— Ram Kadam (@ramkadam) July 7, 2020
1/2यह दो दलों का आपसी समन्वय की कमी ?या दो दलों के बीच में मनमुटाव ? झगड़ा क्या कारण ? या इस पोर्टल के नाम से सरकार किसका भला करना चाहती है पुलिस की काटी हूँई तनखा अब तक न देने वाली महाराष्ट्र सरकार जनता के करोड़ों रुपए की लूट कर रही है सरकार को इसका जवाब देना होगा@nawabmalikncp
— Ram Kadam (@ramkadam) July 7, 2020