मुंबई: सध्या राज्यभरात नगरपंचायत निवडणूकींची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय नेत्यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आता बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जीभ घसरली आहे. गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकावर जोरदार टीका केली. ही टीका करताना गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना खासदार हेमा मालिनी यांच्या गालाशी केल्याने आता नवा वाद उभा राहिला आहे.
‘माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते मी केले. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता’, असा सवाल देखील गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रासाठी काशीइतकीच पवित्र – केंद्रिय मंत्री अमित शाह
गुलाबराव पाटील यांच्या या बेताल वक्तव्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरताहेत.. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत.. पण पोलिस यंत्रणांना यांत महिलांचा विनयभंग दिसत नाही…मी गृहमंत्र्यांना आवाहन करतेय, तात्काळ गुन्हा दाखल करा.. नाहीतर गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.’ असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
Read also:
- महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रासाठी काशीइतकीच पवित्र – केंद्रिय मंत्री अमित शाह
- छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना होणं, ही छोटी गोष्ट; मुख्यमंत्र्याचा संतापजनक वक्तव्य
- रामदास कदमांच्या गंभीर आरोपांवर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- शिवसेना पक्षप्रमुख कोण? उद्धव ठाकरे की अनिल परब? रामदास कदमांचा हल्लाबोल
- जो प्रयत्न अमरावतीत झाला तो पुन्हा झाला तर सोडायचं नाही; राज ठाकरेंचे आदेश