मुंबई : माजी मंत्री रामदास कदम यांनी आज तडकाफडकी पत्रकारपरिषदेत शिवसेनेतेल्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. दापोली मतदारसंघात सध्या नगरपंचायतीच्या निवडणूका आहेत. आम्हाला संपविण्याचा प्रयत्न परिवहनमंत्री अनिल परब, सुनील तटकरे, उदय सामंत करत आहेत असा आरोप माजी मंत्री रामदास कदम यांनी केल्याने आता खळबळ उडाली आहे.
अशोक चव्हाण बरोबर बोलतायं, काँग्रेसमुळेच महाविकास आघाडीची सत्ता; बाळासाहेब थोरातांचा इशारा
आम्ही दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला वाढवण्याचं काम केलं आहे. राष्ट्रवादीचा बोलबाला असलेला मतदारसंघ आम्ही त्यांच्या ताब्यातून हिसकून घेतला होता. माझे सुपुत्र योगेशजी कदम यांनी दिवसरात्र मेहनत केली आणि पाच वर्षांमध्ये दापोलीमध्ये पूर्ण ठिकाणी भगवा फडकावला. असं असताना आज आमच्यावर अन्याय केला जात आहे. अनिल परब हे परिवहनमंत्री आहेत. तिकडं आंदोलन सुरु आहे, कर्मचारी आत्महत्या करत आहेत आणि हा आमच्या मतदारसंघात येऊन जाहीर सभा घेतो, आमच्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी करतो, आम्हाला त्रास देतो आहे.
परिवहनमंत्री अनिल परब, सुनील तटकरे, उदय सामंत, माजी आमदार सूर्यकांत दळवी, संजय कदम यांनी एकत्रित येऊन माझ्या मुलाच्या विरोधात येऊन कट कारस्थान करत आहेत. आज शिवसेना संपविण्याचा प्रयत्न या सगळ्यांकडून होत आहे. संजय कदम यांना शिवसेनेत आणून माझ्या मुलाच्या विरोधात त्याला उभे करण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहे.
मी त्या गुजरातमधून आलोयं, जिथं ५० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात; हार्दिक पटेलांची टीका
शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला विश्वासात न घेता थेट राष्ट्रवादीला सगळं देण्याचं काम सध्या सुरु आहे. अनिल परबच्या बापाचा मतदारसंघ आहे का ? सुनील ताटकरेला गहाण ठेवले आहे ? असा संतप्त प्रश्न रामदास कदमांनी विचारला आहे. जेव्हा कणकवलीत शिवसेनेवर अन्याय होत होता तेव्हा आम्ही उद्धव साहेबांच्या गाडीच्या पुढच्या सीटवर बसलो होतो. आम्ही कोकणात शिवसेना वाढवली आहे. मी कडवा शिवसैनिक आहे. राष्ट्रवादीच्या गद्दरांचा नायनाट दापोलीचे जनता करेल असं देखील रामदास कदम शेवटी म्हटले आहेत.
Read also:
- आमच्या टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करतो; क्रिकेटच्या मैदानावर जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अचानक रात्री विधानभवनात मारली धडक; विधानभवनाची केली पाहणी
- बेळगावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान; मराठी भाषिकांचा संघर्ष पेटणार, आज बंदची हाक
- महापालिका करसंकलन विभागात “गोलमाल है, सब गोलमाल है..!” दोन कर्मचारी सापडले एसीबीच्या जाळ्यात..!
- उद्धवा अजब तुझे सरकार; स्वतःच्या पक्षालाच दिलाय निधी वाटपात सर्वात कमी निधी