मुंबई : तब्येतीच्या कारणामुळे गेले काही दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर वर्षा निवास्थानी होते. काल संध्याकाळी मात्र अचानक त्यांनी विधानभवनात प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी अचानक विधानभवनात उपस्थिती दर्शविल्यामुळे कर्मचाऱ्यांची मात्र धांदल उडाली.
अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते; भाजप नेते निलेश राणेंचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व तयारीची पाहणी केली. विधान भवनातील विधानसभा आणि विधानपरिषदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये जाऊन त्यांनी तिथल्या पूर्व तयारीची पाहणी केली, अशी माहिती देखील त्यांनी सूत्रांना दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही दिवसांपूर्वी मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यावर सर्व्हाइकल स्पाईन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून ते कोणत्याही कार्यक्रमाला हजर नव्हते. शुक्रवारी रात्री अचानक त्यांनी अनिल परब यांना घेऊन विधानभवनाची पाहणी केली.
अशोक चव्हाण बरोबर बोलतायं, काँग्रेसमुळेच महाविकास आघाडीची सत्ता; बाळासाहेब थोरातांचा इशारा
त्यांनी अधिवेशन काळात विधान भवनात कुठेही चालण्याचा त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालण्याचा सरावही केला. अधिवेशनाच्या कामकाजात सत्ताधारी पक्षातील, विरोधी बाकावरील दोन्ही सदनातील आमदार जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करीत असतात. यावेळी त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर पीठासीन अधिकारी काही वेळेस ताबडतोब निर्देश देत असतात. तसेच लोकप्रतिनिधी प्रश्न उपस्थित करून त्याबद्दल कोणती कार्यवाही केली यावर प्रश्न विचारत असतात. त्यावेळी ताबडतोब माहिती सदनाच्या पटलावर अथवा संबंधित खात्याचे मंत्री, राज्यमंत्री यांना उपलब्ध करून द्यावी लागते.
Read also:
- बेळगावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान; मराठी भाषिकांचा संघर्ष पेटणार, आज बंदची हाक
- महापालिका करसंकलन विभागात “गोलमाल है, सब गोलमाल है..!” दोन कर्मचारी सापडले एसीबीच्या जाळ्यात..!
- उद्धवा अजब तुझे सरकार; स्वतःच्या पक्षालाच दिलाय निधी वाटपात सर्वात कमी निधी
- मी त्या गुजरातमधून आलोयं, जिथं ५० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात; हार्दिक पटेलांची टीका
- राज्यात सत्ता असतानाही एका नगरपंचायतीच्या जागेसाठी संघर्ष करणे, यातच राष्ट्रवादीचा पराभव – चंद्रकांत पाटील