अहमदनगर : कर्जत जामखेड नगरपंचायतीची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेडमधील वातावरण चांगलेच पेटलेले दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी लढाई कर्जतमध्ये बघायला मिळणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये मोठी राजकीय सभा आयोजित करण्यात आली होती.
एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्यासाठी आयोगाला विचार करावाच लागेल – बाळासाहेब थोरात
या सभेत काँग्रेसचे गुजरात मधील नेते हार्दिक पटेल उपस्थित होते. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. हार्दिक पटेल म्हणाले की गुजरातमध्ये आम्ही चांगल्या चांगल्याना पाणी पाजले आहे. मी रायगड जिल्ह्यातल्या कर्जतचे नाव मागील काळात ऐकले होते. आता मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये रोहित पवारांमुळे मी कर्जतचे नाव ऐकले आहे.
राज्य सरकारचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने फेटाळला; ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार
मी त्या गुजरातमधून आलेलो नाही जिथं दोन तीन लोक दिल्लीत सत्ता लाटत आहेत. मी त्या गुजरातमधून आलो आहे जिथून महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशासाठी संघर्ष केला. गुजरातच्या नावाखाली मोदी पंतप्रधान झाले मात्र याच गुजरातमध्ये ५० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गुजरातमध्ये लाखो तरुण बेरोजगार आहेत. तिथे एकाच वर्षात 50 हजार कोटीचे ड्रग्ज पकडले गेले. या गोष्टी कोणीही सांगत नाही. भाजप खोट सांगून सत्ता मिळवते.
केंद्र सरकारने ओबीसींची जनगणनाच केली नाही; छगन भुजबळांचा धक्कादायक दावा
पटेल पुढे म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रात मोठे काम केले आहे. ते मोठे नेते आहेत. त्यांच्या कुटुंबाला केंद्र सरकार ईडीचा उपयोग करून त्रास देत आहे. तुमच्याकडे मतातून भाजपला उत्तर देण्याची संधी आहे. तुमच्या मतांतून तुम्ही पवार कुटुंबीयांना साथ द्या. भाजपला त्यांची जागा दाखवा.
कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, वीज वापराल तर बिल भरावंच लागेल – नितीन राऊत
मी ९ महिने आंदोलनामुळे तुरुंगात काढले. मात्र मला त्याचा आनंद आहे. आमची लढाई ही आगामी पिढीसाठी आहे. उद्या जेव्हा आपली मुलं मोठी होतील आणि आप्ल्यालाला विचारतील की देशात अराजकता माजताना तुम्ही काय करत होता ? तेव्हा मी त्यांना सांगेन की मी तुरुंगात होतो, असा टोलाही हार्दिक पटेलांनी केंद्र सरकारला मारला आहे. प्रचार सभेला मंत्री धनंजय मुंडे, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार, कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत आदी उपस्थित होते.
Read also:
- राज्यात सत्ता असतानाही एका नगरपंचायतीच्या जागेसाठी संघर्ष करणे, यातच राष्ट्रवादीचा पराभव – चंद्रकांत पाटील
- अशोक चव्हाण बरोबर बोलतायं, काँग्रेसमुळेच महाविकास आघाडीची सत्ता; बाळासाहेब थोरातांचा इशारा
- अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते; भाजप नेते निलेश राणेंचा खळबळजनक दावा
- 20 डिसेंबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई होणार नाही – अनिल परब
- भाजपला सुरुंग: भुसावळमधील तब्बल २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश