जळगांव : भुसावळमध्ये भाजपला मोठा झटका बसलाय, कारण भाजपला मोठे खिंडार पडले आहे. भाजपच्या 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालाय. अजित पवार यांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी हाती घड्याळ बांधलंय. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी भाजपला जोरदार धक्का दिलाय.
राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मला सुरक्षित असल्याची जाणीव होतेयं; रुपाली पाटलांच्या भावना
एकानाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर खडसेंनी आधी भाजपला धक्का देत जळगाव महानगरपालिकेत पारडे फिरवले, त्यानंतर भुसावळमध्येही खडसेंनी भाजपला मोठे खिंडार पाडले आहे.
आम्ही आहोत म्हणून महाविकास आघाडीची सत्ता आहे; अशोक चव्हाण यांच वक्तव्य
भुसावळमध्ये भाजपला एकनाथ खडसे यांनी खिंडार पाडताना तब्बल 21 नगरसेवकांना राष्ट्रवादीत आणले आहे. राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या सर्व नगरसेवाकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचं जळगावमध्ये हे मोठे डॅमेज आहे, भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांना खडसेंनी शह दिला आहे.
Read also:
- कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, वीज वापराल तर बिल भरावंच लागेल – नितीन राऊत
- केंद्र सरकारने ओबीसींची जनगणनाच केली नाही; छगन भुजबळांचा धक्कादायक दावा
- राज्य सरकारचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने फेटाळला; ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार
- एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्यासाठी आयोगाला विचार करावाच लागेल – बाळासाहेब थोरात
- एसटी कर्मचाऱ्यांनो, आता सहनशीलता संपत आलीयं, आमचा अंत पाहू नका; अजित पवारांचा इशारा