जळगांव : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अद्यापही सुरुच आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी समजूतदारपणा दाखवावा, राज्य सरकारच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. नाईलाजाने राज्य सरकारला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असे आवाहन अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं आहे. लवकरात लवकर कामावर रूजू होण्याची विनंती यावेळी अजित पवार यांनी केली.
“किरीट सोमय्या यांनी माझी माफी मागावी अथवा १०० कोटी भरावे”; परबांचा दम
उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, राज्यातील शाळा आणि कॉलेज सुरु झाले आहेत. भरती होत असताना मुलांना गोर गरिबांना प्रवास करण्यासाठी एसटी हा पर्याय आहे. अशा परिस्थितीमध्ये कर्मचारी हट्टाला पेटले आहेत. यामध्ये अतिशय समजूतदारपणे भूमिका घेतली पाहिजे असे अजित पवार म्हणाले आहेत.
जर मी बिनधास्तपणे बोलायला लागले तर अवघड होईल; रुपाली पाटील यांचे वसंत मोरेंना थेट उत्तर
राज्यातील जनतेला अनेकदा सांगितले आहे की, राज्यातील कोणताही प्रश्न असला तरी तो प्रश्न मांडणाऱ्याने एक दोन पावलं पुढे-मागे सरकलं पाहिजे आणि ज्यांच्याकडे मागण्या असतात त्यांनीसुद्धा तसेच केले पाहिजे. अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. राज्य सरकारकडून मंत्री अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आहेत चर्चा करत आहेत. परंतु कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, राज्य सरकारला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका.
नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का; माजी आमदार संजय पवारांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत मुभा देण्यात आली परंतु आता सहनशीलता संपण्याची वेळ आली आहे. आता सहनशीलतेचा अंत कृपा करुन पाहू नये. माझी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, आता कुठेतरी कामावर येऊन सुरुवात केली पाहिजे. एसटी सुरु झाल्याच्या ठिकाणी दगडफेक करण्यात येत आहे. शेवटी एसटीचे नुकसान झालं म्हणजे ते जनतेचं नुकसान असतं. यामुळे एसटीचे नुकसान होत आहे. उद्या एखादी वेगळी भूमिका घेऊन मेस्मासारखा निर्णय घेतला गेला. टोकाचा निर्णय घेतला तर मागील काळातील संपाचे काय परिणाम झाले हे तुम्ही पाहिलं आहे. असा सूचक इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
Read also:
- आम्ही आहोत म्हणून महाविकास आघाडीची सत्ता आहे; अशोक चव्हाण यांच वक्तव्य
- राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मला सुरक्षित असल्याची जाणीव होतेयं; रुपाली पाटलांच्या भावना
- ओबीसी आरक्षणासाठी लवकरात लवकर कोर्टात धाव घ्या; पंकजा मुंडेंची आर्त हाक
- म्हाडा, टीईटी पेपर फुटी प्रकरण: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक
- एसटी आंदोलनाचा अनिल परबांनी घेतला धसका; परबांच्या सुरक्षा व्यवस्थेत झाली मोठी वाढ