नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने नाशिकचे राजकारण आत्तापासूनच तापायला लागले आहे. इतर पक्षांमध्ये प्रवेश करण्यासाठी आता नेत्यांच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता पक्षीय फोडाफोडीला सुरुवात केली आहे.
पिंपरी- चिंचवडचा पाणीप्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन ठरले ‘फुसका बार’
नांदगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजय पवार आणि मालेगावमधील काही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून पक्षांतराच्या वावड्या नांदगावच्या राजकारणात उठत होत्या. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पक्षांतरामुळे आता भारतीय जनता पक्षाला चांगलाच धक्का बसला आहे. मालेगाव येथील अनिल वाघ, संजय वाघ तसेच अशोक पवार, बाळासाहेब चव्हाण, विठल आहेर, हिरामण वडगर, सुधाकर पवार, मच्छिंद्र सातपुते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील येवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपर्क कार्यालयात आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
बैलगाडा शर्यत लढा : विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा… आपल्या सर्जा-राजाचा…!
यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार पंकज भुजबळ, अॅड रवींद्र पगार, नांदगावचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष बाळकाका कलंत्री, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, अरुण थोरात, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, राजेंद्र नहार, सोपान पवार, दत्तू पवार, राजाभाऊ लाठे, अमित पाटील, अमजद पठाण, मोहन शेलार, विनोद शेलार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या महामारीमुळे बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे अनेक विकास कामांना ब्रेक लागला होता. आता विकासाची ही कामे आता पुन्हा जलद गतीने सुरू झालेली असून नांदगाव मतदारसंघात रखडलेल्या प्रकल्पांना न्याय देण्यात येईल असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल असे आश्वासन पक्षस्रेष्ठींकडून देण्यात आले आहे.
Read also:
- जर मी बिनधास्तपणे बोलायला लागले तर अवघड होईल; रुपाली पाटील यांचे वसंत मोरेंना थेट उत्तर
- “किरीट सोमय्या यांनी माझी माफी मागावी अथवा १०० कोटी भरावे”; परबांचा दम
- ओमायक्रॉनचा धोका: मुंबईत ३१ डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू, उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई
- शिवसेना खासदारानेच कोरोना नियमांचा उडविला फज्जा; ठाकरे सरकार हेमंत पाटलांवर कारवाई करणार का?
- मुंबै बँकेत सर्वपक्षीयांचं ठरलं! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार