पुणे – पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दबंग नेत्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश उपाध्यक्ष, माजी नगरसेवक डॉ. रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षस्रेष्टींकडे पाठवत मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्या राजीनाम्याने पुणे शहरात मनसेला खिंडार पडले आहे. आजच दुपारी रुपाली पाटील ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे. प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते.
ठाकरे सरकारला मोठा धक्का: ओबीसी आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली आहे. आज मला खरच खूप चांगलं वाटतं आहे. अजित दादांनी मला शब्द दिला आहे की तुम्हाला आगीतून फुफाट्यात आल्यासारखं कधीही वाटणार नाही यांची मी ग्वाही देतो. ज्या आक्रमक पद्धतीने तुम्ही काम करता त्याच आक्रमक पद्धतीने काम सुरु ठेवा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असं देखील अजित दादा म्हटले आहेत.
तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का निवडला ? हा प्रश्न जेव्हा ठोंबरेंना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी म्हटलं की अजित दादा पवार यांचं पुण्यातील काम मी पाहिलं आहे. त्यांनी आम्ही दुसऱ्या पक्षाचे असताना कधीही कोणत्याच बाबतीत भेदभाव केला नाही. त्यांचा अधिकाऱ्यांवर असणारा वचक आणि नियमांच्या चौकटीत बसून काम करण्याची पद्धत मला भावली म्हणून मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
पक्षातल्या रिकामटेकड्या नेत्यांमुळे पक्ष सोडण्याची वेळ आली; रुपाली पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
तसेच मी ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आक्रमकपणे काम करत होते त्याच पद्धतीने माझं काम आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील करणार आहे. अजित दादांनी देखील मला तसाच शब्द दिला आहे. लोककल्याणाची, जनतेची जी काही कामे आहेत ती लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आता पुन्हा एकदा करणार आहे असं देखील म्हटलं आहे.
Read Also :