मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांना शिवसेनेने मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेने नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांमधून रामदास कदम समर्थकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तसेच नव्या नियुक्त्यांमध्ये एकाही कदम समर्थकांना स्थान देण्यात आलेले नाही. आधी विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर आता कदम समर्थकांना जिल्हा संघटनेतून डच्चू दिल्याने रामदास कदम यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
आता किराणा दुकानात वाईन मिळणार; ठाकरे सरकार लवकरच घोषणा करणार?
शिवसेना नेते रामदास कदम यांना त्यांचे वादग्रस्तं आँडियो क्लीप प्रकरण चांगलेच भोवल्याचं दिसून येतंय. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांत शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांना हटवून, तात्काळ त्यांच्या पदांवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांना मोठा झटका मिळालाय. शिवसेनेत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जागा नाही हे पुन्हा एकदा शिवसेना पक्ष प्रमुखांनी ठामपणे दाखवून दिल्याचीही चर्चा सध्या शिवसेनेत सुरू आहे.
आणखी दोन वर्षांत मी विरोधकांकडे काहीच शिल्लक ठेवणार नाही; आर. आर. आबांच्या मुलाने शड्डू ठोकला
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्रित येण्याचे घटत आहे. भाजप विरोधात एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचं या दोन्ही पक्षाने ठरवलं आहे. संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्थानिक खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांच्यात चर्चा झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
राजू निगुडकर, उपजिल्हाप्रमुख, उत्तर रत्नागिरी
किशोर देसाई,विधानसभा क्षेत्रप्रमुख, दापोली विधानसभा
ऋषिकेश गुजर, तालुकाप्रमुख, दापोली तालुका
संतोष गोवले, तालुकाप्रमुख, मंडणगड तालुका
संदीप चव्हाण, शहरप्रमुख, दापोली शहर
विक्रांत गवळी, उपशहरप्रमुख, दापोली शहर
Read Also :
- ठरलं! रुपाली पाटील हातावर घड्याळ बांधणार, अजितदादांच्या उपस्थितीत मुंबईत होणार पक्षप्रवेश
- चंद्रकांत पाटलांच्या वैधानिक अभ्यासाबद्दल न बोललेलंच बरं – भास्कर जाधव
- बैलगाडा शर्यतीचा लढा: सुप्रिम कोर्टाच्या सुनावणीत उद्या अंतिम निर्णय, आमदार महेश लांडगे यांची माहिती
- किरीट सोमय्याच्या रडारवर आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे; ‘त्या’ घोटाळ्याची ईडीमध्ये तक्रार दाखल
- ओबीसींचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने डेटा गोळा करावा – नाना पटोले