मुंबई : राजकीय क्षेत्र हे असं आहे जिथं काहीही घडू शकतं. आपण कित्येकदा अंदाजही लावू शकत अशा गोष्टी राजकारणात झालेल्या आहेत. ताज उदाहरण घ्यायचं झालं तर आपण बघू शकतो की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लोकांना सकाळी उठण्याच्या आत आपला शपथविधी पूर्ण केला होता.
भाजपची महाराष्ट्रातील ‘ही’ बुलंद तोफ धडाडणार आता गोव्यात
सध्या स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल राज्यात वाजले आहे. यामुळे राजकीय नेत्यांचे विविध ठिकाणी दौरे सुरु आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या रोहित पाटील हे ही नगरपंचायतीच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. त्यांनी एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
मनसेतील ठोंबरेच्या राजीनाम्यानंतर संदीप देशपांडेची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले ‘असं’ काही…
त्यांनी प्रचार करत असताना म्हटलं आहे की २५ वर्षाच्या तरुणाविरुद्ध सर्वजण एकवटले आहेत का ? माझं वय २३च आहे, २५ होईपर्यंत विरोधकांकडे काहीच ठेवत नाही असं म्हणत त्यांनी जिल्ह्यातील विरोधकांना इशारा दिला आहे. दरम्यान सांगलीतील कवटेमहांकाळ परिसरात काल त्यांचा दौरा होता. यावेळी ते बोलत होते.
हिंदू वोट बँकेचं माहित नाही मात्र शिवरायांनी पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं – सजंय राऊतांचा टोला
दरम्यान त्यांनी म्हटले आहे की २३ वर्षीय तरुणाच्या विरोधात प्रस्थापित मंडळींना एकत्र येऊन माझ्यसारख्या युवकाच्या विरोधात निवडणूक लढवावी लागते यापेक्षा माझा मोठा विजय दुसरा काय आहे. हा त्यांचा नैतिक पराभवच आहे. कवटेमहांकाळ शहराचा विकास करणे हे माझे मुख्य लक्ष आहे. दोन वर्षात विरोधकांचा सुपडा साफ करणार असा इशारा युवा नेते रोहित पाटील यांनी दिला. प्रचार शुभारंभप्रसंगी त्यांना केलेल्या या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सध्या त्यांच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहे.
Read Also :
- शिवरायांचा अवमान करणारी ही भाजपची छिंदम प्रवृत्ती; सचिन सावंत यांचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात
- आता किराणा दुकानात वाईन मिळणार; ठाकरे सरकार लवकरच घोषणा करणार?
- उमेदवार शोधताना शिवसेना-काँग्रेसची दमछाक; देहू नगरीतील खरी लढाई राष्ट्रवादी-भाजपमध्येच!
- पक्षातल्या रिकामटेकड्या नेत्यांमुळे पक्ष सोडण्याची वेळ आली; रुपाली पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
- ठाकरे सरकारला मोठा धक्का: ओबीसी आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली