मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला, असे वक्तव्य काल मंगळवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजकीय उमेदवारांच्या तिकिटाबाबत बोलताना केले. चंद्रकांत पाटील पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. या वक्तव्याला आता सर्वच स्तरातून विरोध होत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे आणि भाजपावरही सडकून टीका केली आहे.
भाजपची महाराष्ट्रातील ‘ही’ बुलंद तोफ धडाडणार आता गोव्यात
चंद्रकांत पाटील काय म्हणतात याला अजिबात महत्व नाही आणि त्यांच्या म्हणण्यावर काही भूमिका ठरवली जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बँक तयार केली की नाही याबद्दल मला काही माहित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातील सर्वात पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचाच विचार हिंदूह्रदयम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्याआधी वीर सावकर यांनी महाराष्ट्रात आणि देशात रुजवला,” असं संजय राऊत म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांवर अखेर बडतर्फीचा घाव; राज्य सरकार पाठवणार ‘ही’ नोटीस
बाळासाहेब ठाकरेंना हिंदुहृदयसम्राट ही पदवी जनतेने दिलेली आहे. मराठी माणसाने मराठी माणसालाच मत द्यावं तसं एक दिवस देशातील हिंदूंना मी हिंदू म्हणून मत द्यायला लावीन असं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्याच प्रमोद महाजन म्हणाले होते.
मनसेला मोठे खिंडार, रुपाली पाटील यांचा राजीनामा; मनगटावर ‘घड्याळ’ बांधणार
१९९२ सालच्या निवडणुकीनंतर बाळासाहेबांनी हे सर्वांना सिद्ध देखील करून दाखवलं. पार्ल्यात जेव्हा शिवसेना पोटनिवडणुकीत लढली तेव्हा ती हिंदुत्वाच्या मुद्यावर लढली. तेव्हा हिंदू म्हणून आपण निवडणूक लढायला हवी असा विचार तेव्हा कोणाच्याही मनात आला नव्हता. हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेच्या कित्येक आमदारांचं निलंबन देखील झालेलं आहे. रमेश प्रभू, सुर्यकांत महाडिक आणि आणखी एका आमदाराला हिंदू व्होट बँक म्हणून मतं मागितल्याने तसंच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढल्याने अपात्र ठरवण्यात आलं होतं असा इतिहासही संजय राऊत यांनी सांगितला आहे.
Read Also :
- मनसेतील ठोंबरेच्या राजीनाम्यानंतर संदीप देशपांडेची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले ‘असं’ काही…
- भाजपची महाराष्ट्रातील ‘ही’ बुलंद तोफ धडाडणार आता गोव्यात
- राजकारण महाराष्ट्राचे : भाजपाच्या चित्रा वाघ यांना रोखण्यासाठीच रुपाली पाटलांचा प्रवेश
- तुम्ही कायम माझ्या हृदयात रहाल; रुपाली पाटील यांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भावनिक पत्र
- बैलागाडा शर्यतीचा आज होणार ‘फैसला’; आमदार महेश लांडगेंनी दिल्लीत तळ ठोकला !