पुणे : भाजपा उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणापासून महिला अत्याचार आणि महिला सशक्तीकरणाच्या मुद्यावर महाविकास आघाडीला चांद्यापासून बांद्यापर्यंत सळो की पळो करुन सोडले. महाविकास आघाडीत एका मंत्र्याला घरी बसावे लागले. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या तोडीस तोड आक्रमक चेहरा पुढे आणण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मनसेच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांना अवतान दिले. मात्र, यामुळे पुण्याच्या राजकारणात मराठा- माळी असा नवा सत्तासंघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे.
बावनकुळेंचे गडकरी निवासस्थानी कोडकौतुक; कांचनताई गडकरी यांनी औक्षण करून केले विजयाचे स्वागत
संपूर्ण महाराष्ट्रभर प्रभावी ‘फेस व्हॅल्यू’आणि आक्रमक भूमिका मांडणारी नेता रुपाली पाटील- ठोंबरे यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला. गेल्या काही दिवसांपासून पाटील राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला आहे.
“काँग्रेसला स्वतःची मते राखता आली नाहीत, ते राज्याचे नेतृत्व काय करणार?”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना महाराष्ट्र महिला आयोगाचे अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रदेशाध्यक्षपदी नवीन आणि आक्रमक चेहऱ्याला संधी देण्यात येईल, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली पाटील-ठोंबरे यांना संधी देवून भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
“हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त मतदानाने घ्या”
वास्तविक, रुपाली पाटील- ठोंबरे मराठा समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जातात. तसेच, रुपाली चाकणकर यांच्याकडे माळी समाजाचा प्रभावी चेहरा म्हणून ओळखल्या जातात. राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांच्यानंतर चाकणकर यांनी पुण्याच्या राजकारणात स्वत:ची ‘स्पेस’निर्माण केली होती. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चाकणकर यांना खडकवासला मतदार संघातून उमेदवारीसाठी विचारणा केली होती. मात्र, चाकणकर यांनी नकार दिला होता. दुसरीकडे, मनसेच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे यांनीही पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून धडाकेबाज कामगिरी केली आहे. तसेच, २०१९ मध्ये विधानसभा आणि त्यानंतर पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवली होती. चाकणकर आणि पाटील दोन्ही नेत्या राजयकीयदृष्टया प्रचंड महत्त्वाकांक्षी आहेत. त्याचच फटका आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मराठा आणि माळी अशा वादात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, रुपाली पाटील- ठोंबरे यांच्या प्रवेशामुळे रुपाली चाकणकरांची अस्वस्थता वाढणार आहे.
चित्रा वाघ भाजपाचा प्रभावी महिला चेहरा…
वकृत्व, नेतृत्त्व आणि कर्तुत्व याचा मिलाफ असलेल्या चित्रा वाघ यांना प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर वाघ यांनी महिला आणि विद्यार्थ्यांसह सामाजिक प्रश्नांवर महाविकास आघाडी सरकारविरोधात रान पेटवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महिलांचे सक्षम जाळे निर्माण करण्यात वाघ यशस्वी झाल्या आहेत. पूर्वी राष्ट्रवादीच्याच महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या चित्रा वाघ यांनी प्रदेश भाजपामध्ये महिला नेतृत्वाची असलेली पोकळी भरून काढली आणि नेतृत्त्वाची छापही ठेवली आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाकडूनही त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. सुमारे २० वर्षे राष्ट्रवादीच्या महिला आघाडीत सक्रिय असलेल्या वाघ यांना राष्ट्रवादीच्या राजकारणातील खडानखडा माहीत आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे आणि युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनाही वाघ यांनी ‘लक्ष्य’ केले होते. भाजपा महिला आघाडीचे पद नसले तरी आक्रमक महिला चेहरा असलेल्या चित्रा वाघ यांना रोखण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.
Read Also :
- तुम्ही कायम माझ्या हृदयात रहाल; रुपाली पाटील यांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भावनिक पत्र
- बैलागाडा शर्यतीचा आज होणार ‘फैसला’; आमदार महेश लांडगेंनी दिल्लीत तळ ठोकला !
- मनसेला मोठे खिंडार, रुपाली पाटील यांचा राजीनामा; मनगटावर ‘घड्याळ’ बांधणार
- ओबीसी समाजाची 17 डिसेंबरला चक्काजाम आंदोलनाची हाक
- एसटी कर्मचाऱ्यांवर अखेर बडतर्फीचा घाव; राज्य सरकार पाठवणार ‘ही’ नोटीस