मुंबई – नागपूर आणि अकोला-वाशिम विधान परिषद मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून दोन्ही ठिकाणी भाजपने दणदणीत विजय मिळविला. भाजपचा हा विजय महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जातो. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
अजित पवारांची ऑफर; राष्ट्रवादीला निवडून द्या 100 कोटी देतो…!
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला नागपूर आणि अकोला-वाशिमची जागा राखता आली नाही. या निवडणुकीत त्यांची मतंही फुटली. हे चित्र पाहता ज्यांना स्वत:च्या जागा आणि पक्षाची मतं राखता आली नाहीत, ते उद्या राज्याचे नेतृत्व काय करणार, असा टोला दरेकर यांनी काँग्रेसला लगावला.
राज्य सरकारच्या भोंगळ कारभाराला सर्वसामान्य जनता कंटाळली आहे. अकोला आणि नागपूर विधान परिषद निवडणुकीनिमित्ताने जनतेने हे दाखवून दिले. नागपूरमध्ये काँग्रेसची ४० ते ४५ मते फुटली. नागपूरमध्ये भाजपने १७६ तर अकोल्यात १८६ मतांनी विजय मिळवला आहे, असे दरेकर म्हणाले.
शिवसेनेसोबत युती करायला तयार आहे, पण एमआयएमसोबत नाही – प्रकाश आंबेडकर
दरम्यान, नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक मतमोजणीत 549 मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी 275 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना 362, रवींद्र भोयर यांना 1, मंगेश देशमुख यांना 186 मते प्राप्त झाली. या निवडणुकीत बावनकुळे यांनी 176 मतांनी विजय मिळवत काँग्रेसचा पुरता धुव्वा उडवला.
Read Also :
- बावनकुळेंचे गडकरी निवासस्थानी कोडकौतुक; कांचनताई गडकरी यांनी औक्षण करून केले विजयाचे स्वागत
- काँग्रेसची नाचक्की..! काँग्रेसचे उमेदवारला मिळाले केवळ एकच मत..
- “त्यांच्या बापाशी लढून मी त्या पक्षामधून बाहेर पडलो. हे त्यांनी विसरू नये”
- भाजपच्या 12 आमदारांना सुप्रीम कोर्टाचा झटका, अधिवेशनालाही हजर राहता येणार नाही
- विलास लांडे पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर आमदार होणार.!