मुंबई : येत्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात राज्यात महत्वाच्या महानगपालिका निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी मुंबईत सर्वपक्षीयांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेना मुंबईत सोबत लढणार का, यावर बंद दरवाजाआड चर्चा सुरू असल्याच्या बातम्या राजकीय गोटातून समोर येत आहेत.
“गोपीनाथ मुंडेंनी केंद्रावर दबाव आणून आरक्षण मिळवून दिलं असतं”
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत आघाडी करणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. तीन पक्ष मिळून जानेवारीच्या मध्यापर्यंत जागावाटप जाहीर करणार असल्याची घोषणा केली आहे. यासोबतचं आणखी काही पक्ष देखील आमच्यासोबत येत आहेत. त्यानुसार आम्ही आमच्या जागा वाटप करणार आहोत. उद्या आम्ही प्रचाराला सुरवात करत आहोत, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांना धक्का: ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल, भाजपा महिला नेत्यानी दिली तक्रार
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार संविधानात नाही. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय जे करत आहे ते घटनाविरोधी आहे. वारंवार कोव्हिडच्या नावाखाली निवडणुका पुढे ढकलणे चुकीचं आहे. आणीबाणी जरी घोषित होणार असेल तरी निवडणूका पुढे ढकलता येत नाहीत. आम्ही मुंबईच्या पातळीवर एक पर्याय उभा करत आहोत. काँग्रेस सोबत युती करायला आम्ही तयार आहोत. आम्ही त्यांना सतत म्हटलं होत की, तुम्ही ज्या जागा हरलेल्या आहात त्या आम्हाला द्या अशी मागणी केली आहे. काँग्रेसच्या मनात भीती आहे की हरलेल्या जागा हे जिंकतात त्यामुळे आपलं पुढं जाऊन काय होणार असा त्यांना प्रश्न सतावत आहे. त्यामुळे ते युती करायला घाबरत आहेत. म्हणूनच आम्हाला भाजपची बी टीम काँग्रेसने म्हटलं होतं. आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Read Also :
- अजित पवारांची ऑफर; राष्ट्रवादीला निवडून द्या 100 कोटी देतो…!
- किरीट सोमय्यांच्या रडारवर आता महाविकास आघाडीतील ‘हा’ नेता..
- “ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना फक्त शरद पवारच एकत्र आणू शकतात”
- पेपरफुटी प्रकरण: जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर अभाविपची निदर्शने, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची उचलबांगडी
- निवडणुका रद्द होणार की ओबीसींशिवाय?; आज महत्वाचा दिवस, सुप्रीम कोर्टात सुनावणी