मुंबई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर निदर्शने केली जात आहे. म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द केल्यानं विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आव्हडांच्या निवासस्थानासमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा असून आक्रमक कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
शिवसेनेच्या बॅनरमुळे जालन्यात वातावरण तापले; दानवे- खोतकरांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतूरा
अभाविपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शांतपणे निषेध व्यक्त करत होतो तरी आम्हाला ताब्यात घेतलं जात आहे. कालच्या म्हाडाच्या परीक्षेत जो गैरव्यवहार झाला त्याविरोधात आम्ही निषेध करत आहे असं म्हणत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
“विरोधी पक्ष महाराष्ट्रात झोपलेला आहे. काम काय त्यांना?”
आव्हाडांच्या घरासमोर सुरु अशलेल्या निदर्शनावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले होते. पोलिसांनी कार्यकर्त्यांची उछलबांगडी करत त्यांना गाडीतून नेण्यात आले. जितेंद्र आव्हाड पोलिस बळाचा वापर करत असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला. जितेंद्र आव्हाड यांनी भ्रष्टाचार केला असून त्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केली.
…आणि पवार साहेबांबद्दल बोलताना अजितदादांचा कंठ दाटून आला..!
अभाविपच्या आंदोलनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही बाजूने सुरू असलेल्या घोषणाबाजीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. अभाविप, भाजपला या मुद्यावरून फक्त राजकारण करायचे असल्याचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी म्हटले. म्हाडा भरतीचा पेपर फुटला असल्याचे लक्षात आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी नाइलाजाने परीक्षा रद्द करावी लागली होती, असेही परांजपे यांनी म्हटले.
Read Also :
- निवडणुका रद्द होणार की ओबीसींशिवाय?; आज महत्वाचा दिवस, सुप्रीम कोर्टात सुनावणी
- संजय राऊतांना धक्का: ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल, भाजपा महिला नेत्यानी दिली तक्रार
- महापौर करण्यासाठी एका एका नगरसेवकला ३५-३५ लाख रुपये दिले ; विनय कोरेंचा गौप्यस्फोट
- पवार साहेबांचं नेतृत्व फक्त आणि फक्त साडेतीन जिल्ह्यात; निलेश राणेंनी उडवली खिल्ली
- राज्यात ज्याला आजपर्यंत दोन अंकी पाठबळ मिळालं नाही त्याला तुम्ही पंतप्रधान करणार – सताभाऊ खोत