नवी दिल्ली – शिवसेना नेते संजय राऊत यांनी वापरलेल्या एका शब्दाला भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही भाजपने केली आहे. तर दुसरीकडे संजय राऊत आपल्या शब्दावर कायम आहेत. मी वापरलेला शब्द असंसदीय नाही. तो शब्द योग्यच आहे. काय तक्रार करायची ती करा, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना महाराष्ट्रातील विरोधी पक्ष झोपला आहे का? अशी टीका देखील केली.
…तर भाजप आम्हाला फार दुर नाही; राष्ट्रवादीचा शिवसेनेला गर्भित इशारा
मीडियाशी संवाद साधताना एक पत्रकाराने तुमच्याविरोधात भाजपने गदारोळ सुरू केला आहे. तक्रार करण्याची मागणीही केली आहे, असं राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर, ते म्हणाले की, त्यांनी देश पेटवावा. काम काय त्यांना. एखाद्याला मूर्ख म्हटल्यावर ते जर देश पेटवणार असेल तर त्यांनी देश पेटवावा. त्यांच्याकडे आता काही काम नाही. त्यांची डोकी कामातून गेली आहेत. सरकार येत नाही. विरोधी पक्ष महाराष्ट्रात झोपलेला आहे. काय करावं ते त्यांना कळत नाही. खरं तर त्यांना विधायक कामं करता येईल. हे निरुद्योग आहेत. कोणी तरी कोल्हापुरात काय तरी बोलतोय अन् मुंबईतून कोणी त्यावर प्रतिक्रिया देत आहे. यातच विरोधकांचं आयुष्य चाललं आहे. त्यात त्यांना आनंद वाटत असेल तर त्याला काय करू शकतो, असा टोलाही त्यांनी हाणला.
यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. या वाघाच्या जबड्यात हात घाला. आमचे दात मोजा. प्रत्येक शिवसैनिक वाघ आहे. मोजा आमचे दात, प्रयत्न करा. ज्यांच्या तोंडात कवळ्या आहेत, त्यांनी दुसऱ्यांच्या दातांची पर्वा करू नये. आमचे दात मजबूत आणि ओरिजनल आहेत. कुठेही गडबड नाही. विरोधकांना कच्चे चावून खाऊ. आमची ताकद कायम आहे. आम्ही शिवसैनिक आहोत. हे समजून घ्या. आमच्याकडे उधार उसनवारी नाही. आमचे प्रत्येक अवयव जागच्या जागी आहेत. तुम्ही तुमचे अवयव सांभाळा, असा इशाराही त्यांनी दिला.
३०० ते ४०० गाड्यांचा फौजफाटा घेऊन एमआयएम धडकणार मुंबईमध्ये
दरम्यान, संजय राऊत यांनी टीकाकारांना Xतिया असा शब्द वापराल होता. त्यानंतर भाजपने त्याला आक्षेप घेऊन राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत राऊत यांनी टीव्ही9 मराठीला प्रतिक्रिया देताना आपली भूमिका स्पष्ट केली. हे अशिक्षित अडाणी लोकं आहेत. ते हिंदी भाषेचा फार आग्रह धरत असतात. पण राष्ट्र भाषेचे काही शब्दकोश उघडले, पाहिले, चाळले तर मी वापरलेला शब्द असंसदीय नसून त्याचा अर्थ अनेक ठिकाणी मूर्ख, पढत मूर्ख, शतमूर्ख असाच आहे. पण हे लोक ते समजून घेत नाहीत, असा चिमटा राऊतांनी काढला.
Read Also :
- शिवसेनेचा कारनामा: सरकारी कामात अडथळा, तीन माजी नगरसेवकांना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
- एमआयएमच्या रॅलीला मुंबईमध्ये प्रवेश मिळणार नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
- भाजप आमदाराच्या वाढदिवसाच्या बॅनरवर खडसेंचा फोटो; जळगावच्या राजकारणात उडाली खळबळ
- ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले, मुंबईत कलम 144 लागू; रॅली आणि आंदोलन करण्यास मज्जाव
- पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसची ताकद अजिबातच नाही; अजित पवारांनी डिवचलं