पिंपरी चिंचवड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल आता वाजला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार अशी घोषणा मागील काही दिवसांपूर्वी केली होती.
३०० ते ४०० गाड्यांचा फौजफाटा घेऊन एमआयएम धडकणार मुंबईमध्ये
त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत आणि सचिन अहिर यांचा पुणे जिल्हा दौरा झाला. यामध्ये राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती करू अशी घोषणा केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी चिंचवड दौरा झाला. यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या टाळीला टाळी वाजवत नक्कीच विचार करू आणि सन्मानजनक युतीचा प्रस्ताव टाकू असं म्हणलं आहे. या दौऱ्यात अजित पवारांनी काँग्रेसची खिल्ली उडवताना स्वपक्षीयांना देखील चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. काँग्रेस पक्षाची ताकद चिंचवड मध्ये अजितबत नाही. नगरसेवक नाही आणि आमदार, खासदार तर नाहीच नाही असं देखील अजित पवारांनी म्हटलं आहे.
तुम्ही शिवसेनेचं बोट धरुनच मोठे झालात, हे विसरु नका – शंभुराज देसाई
काँग्रेसने स्वबळाची भाषा केल्याने त्यांना त्याचा मार्ग स्वतंत्र आहे. काँग्रेसवर उपरोधिक टीका करताना पदाधिकाऱ्यांना देखील पवारांनी मंचावरच झापले आहे. मला इथली सर्व अंडीपिल्ली माहित आहेत असं म्हणतं त्यांनी पदाधिकाऱ्यांना जाग केलं आहे. चुकीच्या कामांना प्रखऱपणे विरोध करा, मॅच फिक्सिंग करू नका, एकमेकांच्या पायात पाय घालू नका, झालं गेलं ते विसरून पुन्हा एकोप्याने कामाला लागा, असे त्यांनी बजावले. आपल्या चुकांमुळे २०१७ ला येथील सत्ता केली. त्यामुळे त्या सुधारा. नाही, तर त्याची किंमत पुन्हा मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
विधान परिषदेत कोणाची बाजी? अकोला नागपूरमध्ये शिवसेना भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिराच्या समारोपात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे, माजी आमदार विलास लांडे-पाटील, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक मंगला कदम, अजित गव्हाणे, मयूर कलाटे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.
Read Also :
- आमच्या घरी लवकरच सरकारी पाहुणे येणार आहेत; मलिकांच्या ट्विटने पुन्हा खळबळ
- ३०० ते ४०० गाड्यांचा फौजफाटा घेऊन एमआयएम धडकणार मुंबईमध्ये
- …तर भाजप आम्हाला फार दुर नाही; राष्ट्रवादीचा शिवसेनेला गर्भित इशारा
- कल्याणमध्ये शिवसेनेला खिंडार?; माजी आमदार भाजपच्या वाटेवर?
- अनिल परबांकडून ‘त्या’ दहा हजार एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा..!