कल्याण – मला पक्षाच्या कार्यक्रमाला बोलावलं जात नाही. त्यामुळे मी जात नाही. बोलावलं तर जाईल, अशी खंत शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी व्यक्त केली आहे. तसेच मी कुठे जात नाही. पण माझा निर्णय घेण्यास मी सक्षम आहे, असं सूचक विधानही भोईर यांनी केलं आहे. त्यामुळे भोईर हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. भोईर भाजपमध्ये गेल्यास ते भाजपचे लोकसभेचे उमेदवार असू शकतात अशीही जोरदार चर्चा सुरू आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी; पत्रामध्ये अश्लील भाषेचा वापर
2019मध्ये पार पाडलेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेकडून सुभाष भोईर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ही उमेदवारी नंतर रद्द करण्यात आली. त्यानंतर आज भोईर यांनी भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर यांच्या प्रभागातील कार्यक्रमास उपस्थिती लावली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याविषयी त्यांना विचारले असता अशी कुठली चर्चा नसल्याचे सांगून त्यांनी काही सूचक विधानेही केली आहेत.
“मनसे गळकं घर”; औरंगाबाद मनसेत भूकंप! पदाधिकारी शिवसेनेत..!
राज्यात भाजप हा शिवसेनेचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. असं असतानाही सुभाष भोईर थेट भाजप नगरसेवकाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आलं. त्यामुळे माध्यमांनीही भोईर यांनी तात्काळ गराडा घालून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तुम्ही भाजपमध्ये जाणार आहात का? भाजप नगरसेवकाच्या कार्यक्रमाला हजर राहण्यामागचं कारण काय? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर भोईर यांनी अशी कुठली चर्चा नाही. मी जिथे आहे. त्याठिकाणी योग्य आहे. योग्य वेळी निर्णय घेता येईल. त्याची आताच कशाला घाई पाहिजे. मी स्वयंभू आहे. मी कोणाच्या कुबड्या घेऊन पक्षात आलेलो नाही. मला पक्षाच्या कार्यक्रमात बोलविले जात नाही. त्यामुळे मी जात नाही. मला बोलविले तर मी जाईन, असं सूचक विधान त्यांनी केलं.
Read Also :
- मुंबईच्या धारावीत सापडला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण; आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले..!
- पुण्यात रासपची स्वबळावर लढण्याची घोषणा; जानकरांची भाजपपासून फारकत?
- ‘हे सर्व भ्रष्ट शरद पवारांचे शागिर्द’; सोमय्यांच्या रडावर आता धनंजय मुंडे
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिकांनी न्यायालयात मागितली बिनशर्त माफी..
- राष्ट्रवादीत कलह आणि फायदा काँग्रेसचा; मिळाले उपसभापतिपद