भोर – राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासंघर्षाच्या कलहामुळे भोरमध्ये काँग्रेसला मोठा लाभ झाला आहे. कारण पंचायत समितीत एकमेव सदस्य असूनही उपसभापतिपदी काँग्रेसच्या रोहन बाठे यांची शुक्रवाारी बिनविरोध निवड झाली आहे.
स्वातंत्र्य तर संघर्षातून मिळाले, भीक म्हणून मिळाल्या तर त्या पदव्या आणि पुरस्कार – कन्हैयाकुमार
भोर पंचायत समितीच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ४, तर काँग्रेस आाणि शिवसेनेने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. त्यामुळे भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये पदावरून संघर्ष टोकाला गेला. अखेर पक्षाला आपल्याच सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची नामुष्की ओढावली होती. पक्ष आदेशाचा भंग केल्यामुळे राष्ट्रवादीने श्रीधर किंद्रे, दमयंती जाधव व मंगल बोडके या पंचायत समितीच्या तीन सदस्यांची हकालपट्टी केली, त्यामुळे बहुमतातील राष्ट्रवादी पक्ष अल्पमतात आला. शेवटी महाआघाडीचे सूत्र भोरमध्येही लावण्यात आले. त्यानुसार पक्षाचे लहू शेलार हे सभापती झाले. मात्र, उपसभापतीपद मात्र काँग्रेसला द्यावे लागले.
गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव; आशिष शेलार यांना 1 लाखाचा ऑनटेबल जामीन मंजूर
भोर पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी दुपारी झालेल्या निवडणुकीसाठी उपसभापतीपदासाठी कॉंग्रेसचे रोहन बाठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या अर्जावर शिवसेनेच्या पूनम पांगारे ह्या सूचक होत्या. त्यानंतर सभापती शेलार सूचक असलेला बाठे यांचा दुसरा अर्ज दाखल करण्यात आला. मात्र, प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी पहिला अर्ज ग्राह्य धरून रोहन बाठे यांची उपसभापतिपदी निवड झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.
Read Also :
- शिवसेना-राष्ट्रावादीत ठिणगी; शिवसेना सोयीचे वॉर्ड तयार करत असल्याचा दावा
- अनिल परबांकडून ‘त्या’ दहा हजार एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा..!
- विधान परिषदेत कोणाची बाजी? अकोला नागपूरमध्ये शिवसेना भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
- तुम्ही शिवसेनेचं बोट धरुनच मोठे झालात, हे विसरु नका – शंभुराज देसाई
- विधानपरिषद निवडणुकीत पक्ष तटस्थ, तरीही बसपाचे दोन नगरसेवक मतदानाला! कोणासाठी?