नागपूर – विदर्भातील नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशीम या विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आज मतदान होते आहे. दोन्ही जागा महाविकास आघाडी आणि भाजपासाठी प्रतिष्ठेच्या आहेत. नागपूरच्या निवडणुकीवर बसपाने बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती; पण, आज बसपाचे दोन नगरसेवक मतदासाठी आले. कोणासाठी? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोस्टल रोडचा भ्रष्टाचार काढला म्हणूनच माझ्यावर गुन्हा दाखल केला – आशिष शेलार
बसपाने बहिष्कार टाकल्यानंतर तुम्ही कोणासाठी मतदान करणार या प्रश्नाच्या उत्तरात नगरसेवक संजय बोरेवार म्हणालेत की, आमच्या पक्षाने काँग्रेस आणि भाजपावर बहिष्कार टाकला आहे, अपक्ष उमेदवारावर नाही. विधान परिषदेत आमचा प्रतिनिधी पाठवण्याची संधी सहा वर्षांतून एकदा मिळते, त्या संधीचा वापर आम्ही केला आहे.
नागपूर विधानपरिषद निवडणुकीत बसपाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. बसपाची ११ मतं काँग्रेसला मिळावी, यासाठी काँग्रेस उमेदवाराचे प्रयत्न सुरु होते. “काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छोटू भोयर यांना आयात केले, त्यामुळे आमच्यासाठी काँग्रेस-भाजपा सारखी आहे” असे बसपाचे प्रदेशाध्यक्ष ॲड संदीप ताजने म्हणाले होते. परंतु, आता काँग्रेसने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
मोठी बातमी : एसटीच्या १० हजार कर्मचाऱ्यांवर आज निलंबनाची कारवाई
नागपुरात काँग्रेसवर पक्षाच्या उमेदवाराला सोडून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्याची नामुष्की ओढवली आहे. काँग्रेसचे समर्थन असलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख विरुद्ध भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे अशी लढत होत आहे. नागपुरात भाजपाकडे संख्याबळ अधिक असल्याने भाजपाचे पारडे जड आहे.
Read Also :
- “मनसे गळकं घर”; औरंगाबाद मनसेत भूकंप! पदाधिकारी शिवसेनेत..!
- “त्यांना जातीयवादाची काविळ झालीये”; अमोल कोल्हेंनी सुनावलं
- कोट्यवधींची संपत्ती असणारे प्रविण दरेकर मजूर कसे? संभाजी भोसलेंचा आक्षेप
- विधानपरिषदेचे १७ आमदार होणार निवृत्त; महाराष्ट्रात पुन्हा एकदा बदलणार राजकीय गणिते
- काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलला; अपक्ष उमेदवार आणि बावनकुळेंमध्ये थेट लढत होणार!