मुंबई : वरळीच्या बीडीडी चाळीतील मागील काही दिवसांमध्ये एक दुर्घटना घडली होती. दुर्घटनेनंतर आशीष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल बोलत असताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. दुर्घटनेनंतर नायर रुग्णालयात गेलेल्या जखमींना तब्बल ४५ मिनिटे उपचारांविना तसेच ठेवले गेले. त्यांच्यावर औषधोपचार नाही किंवा विचारपूसही करण्यात आली नाही. या बेफिकिरीमुळे चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला, असे नमूद करत शेलार यांनी महापौरांवर टीका केली होती.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार-खासदारांमध्ये खडाजंगी; शिवसेनेतील अतर्गत वाद चव्हाट्यावर
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आता आशिष शेलार यांच्यावर बुधवारी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पेडणेकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यावर आता आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत म्हणून जे मी बोललो नाही ते निर्माण करुन माझ्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत असे म्हटले आहे. सत्य लवकरच समोर येईल. सत्तेचा गैरवापर करून माझयाविरोधात खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत असं देखील शेलार यांनी म्हटलं आहे.
तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटना: १४ पैकी १३ प्रवाशांचा मृत्यू, मृतदेहांची डीएनए चाचणी होणार
बहुचर्चित कोस्टल रोडचा भ्रष्टाचार काढला म्हणून खोट्या केसेस करत आहात का? सावरकरांचा अपमान कोणी करु नये म्हणून प्रश्न उपस्थित केला तर धमकावणाऱ्या नोटीस देत आहात का? मी आणि माझे सहकारी या दडपशाहीला अजिबात घाबरणार नाही हे आता सत्ताधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे. ठाकरे सरकारला जो अहंकार आहे त्याविरुद्ध संघर्ष अजून कडवा केला जाणार आहे. . पोलिसांनी सत्तेचा दुरुपयोग केला त्याचा मी निषेध करतो,” असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
Read Also :
- शशिकांत शिंदे तुम्हाला थंड करुन घरात बसवायची आमच्यात ताकद – शिवेंद्रराजेंनी भरला दम
- शिवसेनेने छाटले रामदास कदमांचे पंख; दापोली विधानसभा क्षेत्रात माजी आमदार सूर्यकांत दळवी पुन्हा सक्रिय
- एक सोपा आणि साधा संकल्प पूर्ण करणार का? पंकजा मुंडेंचे भावनिक पत्र व्हायरल
- पळून गेलेल्या गुन्हेगाराला सुप्रीम कोर्ट अटकेपासून वारंवार संरक्षण का देताय? खासदार अरविंद सावंत
- पिंपरी-चिंचवडचा अभिमान ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’चे काम प्रगतीपथावर; आमदार महेश लांडगेंकडून कामाची पाहणी