दापोली : माजी पर्यावरणमंत्री व शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते रामदास कदम उर्फ भाई व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यात झालेले कथित मोबाईल संभाषण उघड झाल्याचा फटका आता त्यांच्या दापोली विधानसभा मतदारसंघाला बसू लागला आहे.
सायबेरियन पक्ष्यांप्रमाणे काही ‘पक्षी’ कोलकात्याहून येतात, काही दिल्लीहून येतात…
दापोली दापोली व मंडणगड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शिवसेना पक्षाचे उमेदवार निवडीचे अधिकार स्थानिक आमदार योगेश कदम यांना न देता, ते अन्य नेत्यांना देण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली असून अनेकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
उपमहापौर व भाजप नगरसेवक राजेश काळे यांना दोन जिल्ह्यातून केले तडीपार
या सर्व घटनांमुळे माजी मंत्री रामदास कदम आणि त्याचे सुपुत्र आमदार योगेश कदम हे बॅकफूटवर गेले आहेत. शिवसेनेने दापोली व मंडणगड नगरपंचायतीचे उमेदवारी वाटपाचे सर्वाधिकार परिवहनमंत्री अनिल परब यांना दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना ही नगरपंचायत एकत्रितपणे लढणार आहेत. माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या निवासस्थानी येऊन संपर्कप्रमुख सुधीर मोरे, अनिल परब यांनी उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. आमदार कदमांना डावलून हे एबी फॉर्म देण्यात आल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना धक्का बसला आहे.
शिवसेनेचा रामदास कदमांना दे धक्का
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना विधानपरिषदेची उमेदवारी डावलण्यात आली आहे. आत्ता स्थानिक पातळीवर देखील मंडणगड आणि दापोलीतील निवडणुकीची जबाबदारी अनिल परब यांच्याकडे देणे, हा रामदास कदम यांच्यासाठी धक्का मानला जात असून शिवसेनेच्या वरिष्ठांनी आमदार योगेश कदम यांचे पंख कापण्याची तर सुरवात केली नाही ना, याची चर्चाही दापोलीत सुरू आहे.
Read Also :
- एक सोपा आणि साधा संकल्प पूर्ण करणार का? पंकजा मुंडेंचे भावनिक पत्र व्हायरल
- पळून गेलेल्या गुन्हेगाराला सुप्रीम कोर्ट अटकेपासून वारंवार संरक्षण का देताय? खासदार अरविंद सावंत
- पिंपरी-चिंचवडचा अभिमान ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’चे काम प्रगतीपथावर; आमदार महेश लांडगेंकडून कामाची पाहणी
- तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटना: १४ पैकी १३ प्रवाशांचा मृत्यू, मृतदेहांची डीएनए चाचणी होणार
- जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार-खासदारांमध्ये खडाजंगी; शिवसेनेतील अतर्गत वाद चव्हाट्यावर