सोलापूर : फसवणूकीसह विविध गुन्हे दाखल असलेले सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यांना सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांसह इंदापूर तालुक्यातून तडीपार केल्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. काळे यांनी आपल्यावर ही कारवाई झाल्याचे सांगितले आहे.
…तर आदित्य ठाकरेंनी पदाचा राजीनामा द्यावा; नितेश राणेंची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचा मुलगा चेतन गायकवाड यालाही तडीपार करण्यात आले आहे. त्याच्यावरही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, काळे हे भाजपचे निलंबित नगरसेवक असून विद्यमान उपमहापौर आहेत. त्यांच्या फसवणूकीसह सरकारी कामात अडथळा, मारहाण असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
वरळी गॅस दुर्घटना: शिवसेना अनाथ बालकांच पालकत्व स्वीकारणार – महापौर किशोरी पेडणेकर
राजेश काळे यांनी आपल्यावर राजकीय द्वेषातून कारवाई केल्याचा आरोप केला आहे. अनेक खोटे आरोप आपल्यावर करण्यात आले. महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षातील नेत्यांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचलं आहे. सामाजिक कामातील आंदोलनातून गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आता या कारवाईविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे काळे यांनी सांगितले. काळे यांना काही महिन्यांपूर्वीच पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
महाराष्ट्राने केले उद्योगक्षेत्रात विक्रमी करार; एकाच दिवसात तब्ब्ल ५०५१ कोटींची गुंतवणूक.!
सोलापूर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना शिवागाळ केल्याचाही त्यांच्यावर आरोप असून या प्रकरणात त्यांना जानेवारी महिन्यात अटकही झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. काळे यांच्याविरूध्द मागील वर्षी 29 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ते फरार झाले होते. सदर बझार पोलिसांनी पाच जानेवारी 2021 रोजी टेंभूर्णीजवळून त्यांना अटक केली होती.
Read Also :
- सायबेरियन पक्ष्यांप्रमाणे काही ‘पक्षी’ कोलकात्याहून येतात, काही दिल्लीहून येतात…
- मनसे-भाजप एकत्र येणार का?; राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं मोठं विधान
- राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत अजित पवारांचा विसर; होर्डिंगवरून फोटो गायब
- मी जर उत्तर दिलं तर तुमची प्रकृती बिघडेल; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार
- संजय राऊत हे एक नंबरचे डबलढोलकी आहेत; चंद्रकांत पाटील यांचा घणाघात