नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत राष्ट्रवादीची बैठक झाली. मात्र, या बैठकीबाबत वेगळीच चर्चा रंगली आहे. या बैठकीतील पोस्टरवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब झाला होता. पोस्टरवर अजित पवार यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
शिवसेना गोव्यात स्वबळावर तर उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत युती करणार?, संजय राऊतांनी केले स्पष्ट..
दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यालयात जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली होती. या पोस्टरवर महाराष्ट्रातील सर्व नेत्यांचे फोटो होते. मात्र अजित पवार यांचा एकाही पोस्टरवर फोटो नाही. या बैठकीत पाच राज्यांच्या निवडणुका, महागाई आणि इतर आठ मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्या असल्याचे वृत्त आहे.
ठाकरे सरकारने भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड मोडले; भाजप नेते गिरीष महाजनांचा गंभीर आरोप
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते नाशिक महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या बिटको रुग्णालयाचे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे नामकरण करण्यात आले. तेव्हाही रुग्णालयाच्या समोरच शिवसेनेकडून मोठे होर्डिंग लावण्यात आले होते. या होर्डिंगवर बाळासाहेब ठाकरे, संजय राऊत यांचा मोठा फोटो होता तसेच नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो होते. मात्र, मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचाच फोटो होर्डिंगवरून गायब झाला होता. त्याच बरोबर आदित्य ठाकरे यांचाही फोटो होर्डिंगवर लावण्यात आला नव्हता. यावरूनही चर्चांना उधाण आले होते.
Read Also :
- मी जर उत्तर दिलं तर तुमची प्रकृती बिघडेल; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार
- संजय राऊत हे एक नंबरचे डबलढोलकी आहेत; चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
- महाराष्ट्राने केले उद्योगक्षेत्रात विक्रमी करार; एकाच दिवसात तब्ब्ल ५०५१ कोटींची गुंतवणूक.!
- नगरपंचायतीसाठी पारनेरमध्ये आमदार निलेश लंके विरुद्ध सर्वपक्षीय लढत बघायला मिळणार.!
- ओबीसींचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट – आमदार महेश लांडगे