पारनेर : महाराष्ट्रात नुकत्याच नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या त्या भागात राजकीय वातावरण चांगलंच पेटलेलं दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये महाविकास आघाडी पॅटर्नमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आतापासूनच निर्माण झालेली बघायला मिळत आहेत.
श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण न देण्याचं ठरवलंय – प्रकाश आंबेडकर
कोरोनाच्या काळात दमदार काम केलेल्या आमदार निलेश लंके विरुद्ध सर्वपक्षीय असा संघर्ष पारनेरमध्ये बघायला मिळणार आहे. १३ जागांसाठी होणाऱ्या लढतीसाठी आजपर्यंत ८९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यात काँग्रेस पक्षाकडून कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे पारनेरची निवडणूक ही शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात होणार आहे. शिवसेनेकडून विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
ओबीसी नेत्यानो आरक्षण टिकवता येत नसेल, राजीनामा देऊन घरी बसा – बाळासाहेब सान
राष्ट्रवादी काँग्रेसने २, शिवसेनेने १६ व भारतीय जनता पक्ष व शहरविकास आघाडी यांनी सर्व जागांसाठी १२ अर्ज दाखल केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इतर मागासवर्गाच्या चार प्रभागांत निवडणूक स्थगित झाल्याने, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याच चार प्रभागांतील उमेदवारी अर्ज मात्र स्वीकारले नाहीत. त्यामुळे नगरपंचायतीच्या जाहीर झालेल्या १७ जागांपैकी फक्त १३ जागांसाठीच पारनेरमध्ये निवडणूक होत आहे.
अंकिता हर्षवर्धन पाटील होणार ठाकरे घराण्याची सून.. 28 डिसेंबरला विवाहसोहळा
शेवटच्या दिवशी अर्ज दाखल झालेल्या प्रमुख उमेदवारांत शिवसेनेतर्फे माजी सभापती व माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी यांच्यासह स्वाती खोडदे, रोहिणी औटी, प्रांजल कोकाटे, रेणुका रुईकर, युवराज पठारे व अनिता मोढवे यांचा समावेश आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वैशाली औटी, विजेता सोबले, विद्या कारवरे, हिमानी नगरे, उषा खोसे, अंजूम शेख यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
एकूण दाखल अर्ज– ८९
स्थगित झालेल्या प्रभागात दाखल अर्ज – १३
एकूण नगरपंचायतीसाठीच्या जागा – १७
निवडणूक प्रस्तावित जागा – १३
निवडणूक स्थगित जागा – ४
Read Also :
- ओबीसींचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट – आमदार महेश लांडगे
- “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा?”
- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी जागांच्या निवडणुकीला स्थगिती, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय
- आमदार संग्राम थोपटेंची जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाची हॅट्ट्रीक!
- एसटीच्या संपात उभी फूट; आजपासून नवीन पगार वाढ लागू !