पुणे – भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात सोसायटी गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेनेचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे हे कोणत्याही सोसायटीचे संचालक नसल्यामुळे त्यांचा अर्ज मंगळवारी छाननीत बाद झाला आहे. आमदार थोपटे यांची सलग दुसऱ्यांदा बॅंकेवर बिनविरोध निवड झाली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा; ‘या’ नेत्याने केली मागणी
आमदार संग्राम थोपटे यांचे भोर तालुक्यातील सहकार क्षेत्रावर प्राबल्य आहे. तालुक्यात एकुण ७५ सोसायटींपैकी ७३ सोसायटी मतदानास पात्र ठरल्या होत्या. त्यातील जवळपास ५० पेक्षा जास्त सोसायट्यांवर थोपटे यांचे वर्चस्व आहे, त्यामुळे त्यांची निवड निश्चित होती. थोपटेंचे अ वर्ग गटात वर्चस्व असल्याने ते सलग तिसऱ्यांदा जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी निवडून आले आहेत. पहिल्या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे भालचंद्र जगताप यांचा सामना करावा लागला होता. त्या वेळी ७३ पैकी ५२ मतदान घेऊन थोपटे हे विजयी झाले होते, तर दुसऱ्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रघुनाथ केंद्रे यांनी माघार घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती. आता तिसऱ्या वेळी विरोधातील उमेदवार शिवसेनेचे ज्ञानेश्वर शिंदे यांचा अर्ज बाद झाल्याने त्यांची पुन्हा तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.
तुम्ही काय बांगड्या भरल्या आहेत? विखे-पाटलांचा प्राजक्त तनपुरेंवर घणाघात
आमदार थोपटे यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज सोसायटी गटातून भरला होता. तत्पूर्वी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिंदे यांनीही सोसासयटी गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शिंदे यांनी शिवसेनेच्या ताब्यात तालुक्यातील काही सहकारी संस्था असल्याचा दावा केला होता. तसेच, या गटातील मतदारांना आता बदल हवा आहे, असे वक्तव्यही केले होते. शिंदे यांच्या उमेदवारीमुळे तालुक्यात मोठी चर्चा निर्माण झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, शिंदे यांचा अर्जच बाद झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
‘ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळू शकतं’; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला तोडगा
ज्ञानेश्वर शिंदे हे पतसंस्थेचे संचालक अध्यक्ष आहेत. मात्र, ते कोणत्याही सोसायटीचे संचालक नाहीत, त्यांनी अर्ज दाखल करताना पतसंस्था संचालक पदाचा उल्लेख केला नव्हता, त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला आहे. दरम्यान, थोपटे यांनी या बिनविरोध निवडीने भोरमधील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सलग तीनदा जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून निवडून येण्याची थोपटे यांनी हॅट्ट्रीक केली आहे. आमदार थोपटे यांच्या बिनविरोध निवडीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.
Read Also :
- एसटीच्या संपात उभी फूट; आजपासून नवीन पगार वाढ लागू !
- अंकिता हर्षवर्धन पाटील होणार ठाकरे घराण्याची सून.. 28 डिसेंबरला विवाहसोहळा
- ओबीसी नेत्यानो आरक्षण टिकवता येत नसेल, राजीनामा देऊन घरी बसा – बाळासाहेब सानप
- ओबीसी राखीव जागा असलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीला स्थगिती; राज्य निवडणुक आयोगाचा निर्णय
- केंद्र सरकारने राज्याला ओबीसींचा इम्पेरिकल डेटा द्यावा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी