सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलाय. यानुसार आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्यात १०६ नगरपंचायतींमधील ३४४ ओबीसी जागांवरही निवडणुका होणार होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणावरील कायदेशीर पेचानंतर या निवडणुका स्थगित करण्यात आल्यात.
एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा होणार, पण…: अनिल परबांनी टाकली ‘ही’ अट
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षित जागांची निवडणूक जरी स्थगित केली असली तरी इतर प्रवर्गातील जागांवर ठरलेल्या वेळापत्रकानुसारच निवडणुका होणार आहेत. राज्यात १०६ नगरपंचायतींमधील एकूण १ हजार ८०२ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. १,८०२ पैकी ३४४ जागांवर ओबीसी आरक्षण आहे.
…म्हणून शिवेंद्रराजे भोसलेंचा अध्यक्षपदावरून पत्ता कट झाला; शशिकांत शिंदेंनी सांगितले कारण
याशिवाय भंडारा नगरपरिषदेत एकूण ५२ जागांवर निवडणूक होत आहे. त्यातील १३ जागा ओबीसी राखीव आहेत. त्यालाही स्थगिती मिळाली आहे. गोंदियातील जिल्हा परिषदेत ५३ पैकी १० ओबीसी जागांच्या निवडणुका स्थगित आहेत. पंचायत समितीत ४५ ओबीसी जागा आणि महानगरपालिकेची १ जागा यांच्या निवडणुकीलाही स्थगिती देण्यात आली. याशिवाय राज्यातील एकूण ५ हजार ४५४ ग्रामपंचायतींपैकी ७,१३० जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यातही ओबीसी राखीव जागांची निवडणूक स्थगित होणार आहे.
Read Also :
- आमदार संग्राम थोपटेंची जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाची हॅट्ट्रीक!
- एसटीच्या संपात उभी फूट; आजपासून नवीन पगार वाढ लागू !
- अंकिता हर्षवर्धन पाटील होणार ठाकरे घराण्याची सून.. 28 डिसेंबरला विवाहसोहळा
- ओबीसी नेत्यानो आरक्षण टिकवता येत नसेल, राजीनामा देऊन घरी बसा – बाळासाहेब सानप
- ओबीसी राखीव जागा असलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीला स्थगिती; राज्य निवडणुक आयोगाचा निर्णय