पिंपरी चिंचवड : स्थानिक स्वराज्य संस्थांत ओबीसी आऱक्षणाचा महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता.6 डिसेंबर) रद्द केला. त्यावरून भाजपने राज्यातील महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे. ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा तिघाडी सरकारचा हा कट असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केला.
श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण न देण्याचं ठरवलंय – प्रकाश आंबेडकर
आमदार लांडगे म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील सरंजामशाही प्रवृत्तींना ओबीसी समाजाचे राजकारणातील अस्तित्व खुपते आहे. त्यामुळेच राज्य मागासवर्ग आयोगाची आर्थिक कोंडी करून ओबीसी आरक्षणास सुरुंग लावण्याचा आणि त्याव्दारे ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा ठाकरे सरकारचा कट आहे. तो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे उघड झाला, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण न देण्याचं ठरवलंय – प्रकाश आंबेडकर
ओबीसी आरक्षणाच्या गंभीर मुद्द्यावर जाणीवपूर्वक चालढकल करणाऱ्या ठाकरे सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे. राज्यातील ओबीसी समाजाची माहिती गोळा करून त्यांच्या राजकीय मागासलेपणाचा अभ्यास व त्यानुसार अहवाल सादर करण्यासाठी 435 कोटी रुपयांचा प्रस्ताव आयोगाने जुलैमध्येच राज्य सरकारला पाठविला होता, पण सरकारने त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याने आरक्षणासंदर्भात आवश्यक माहिती गोळा करण्याचे कामच सुरू झाले नाही. राज्य सरकारने आदेश दिल्यास एक महिन्याच्या आत हा अहवाल देण्याची तयारी असल्याचे आयोगाने गेल्या ऑगस्टमध्येच स्पष्ट केले होते. मात्र, सरकारने त्यावरही काहीच कार्यवाही न केल्याने आरक्षण गमावण्याची वेळ ओबीसी समाजावर आली, असेही लांडगे म्हणाले.
ओबीसी नेत्यानो आरक्षण टिकवता येत नसेल, राजीनामा देऊन घरी बसा – बाळासाहेब सानप
ओबीसींचे आरक्षण लागू होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढून ओबीसींसोबत आहे, असा महाविकास आघाडी सरकारने दिखावा केला. ओबीसींना केवळ मूर्ख बनविण्यासाठी तो काढला होता, ओबीसी विरोधी शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या या तिघाडी सरकारच्या अनागोंदी कारभारामुळेच अध्यादेशाला स्थगिती मिळाली आहे, असा आरोपही भाजपाकडून करण्यात येत आहे.
Read Also :
- “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा?”
- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी जागांच्या निवडणुकीला स्थगिती, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय
- आमदार संग्राम थोपटेंची जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाची हॅट्ट्रीक!
- एसटीच्या संपात उभी फूट; आजपासून नवीन पगार वाढ लागू !
- अंकिता हर्षवर्धन पाटील होणार ठाकरे घराण्याची सून.. 28 डिसेंबरला विवाहसोहळा